नांदेड , दि . 8 : - लॉकाडाऊनमुळे अडकलेल्या प्रवास करु इच्छिणाऱ्या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या वाहतूक सुविधेची माहिती देण्यासाठी विभागीय कार्यालय राज्य परिवहन नांदेड येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे . या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02462 - 260621 असून यावर संबंधितांनी संपर्क साधावा , असे आवाहन राज्य परिवहन नांदेड विभाग नियंत्रक यांनी केले आहे . कोराना विषाणुचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने 23 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जारी केला आहे . परिणामी नौकरी , शिक्षण व अन्य कारणामुळे राज्यात विविध भागात नागरिक अडकून राहिले आहेत या नागरिकांना त्यांचे इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे . तसेच नांदेड विभागातील प्रत्येक आगारात वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचे संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत .
विभाग नियंत्रक अ . र . कचरे ( कंसात भ्रमणध्वनी क्रमांक ) कंसाबाहेर कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक - ( 8275038417 ) 02462 - 260175 . विभागीय वाहतूक अधिकारी सं . बां . वाळवे आगार प्रमुख ( वरिष्ठ ) नांदेड आगार पु . ता . व्यवहारे - ( 9070706024 ) _ 02462 - 234466 . आगार प्रमुख भोकर सु . धु . पवार ( 8390168613 ) 02467 - 202633 . आगार प्रमुख किनवट मि . पु . सोनाळे ( 9881391958 ) 02469 - 222050 . आगार प्रमुख मुखेड सं . तु . शिंदे ( 9307786083 ) 02461 - 202547 . आगार प्रमुख देगलूर अ . रा . चव्हाण ( 7588523782 ) 9422878417 . आगार प्रमुख कंधार ह . म . ठाकुर ( 9823533890 ) 02466 - 223435 . आगार प्रमुख हदगाव सं . बा . अकुलवार ( 9420461711 ) 02468 - 222344 आगार प्रमुख बिलोली च र समर्थवाड ( 8698094565 ) , 02465 - 223323 . आगार प्रमुख माहूर वि . तु . धुतमल ( 8668482504 ) 02460 - 268424 या संपर्क क्रमांकावर लॉकडाऊनमुळे अडकलेल्या इच्छुक नागरिकांनी प्रवासाबाबत संपर्क साधावा , असेही आवाहन राज्य परिवहन नांदेड विभाग नियंत्रक यांनी केले आहे .







0 comments:
Post a Comment