नांदेड दि . 28 | नांदेड जिल्ह्यात आज दिनांक 28 मे , 2020 रोजी सांयकाळी 5-00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 49 अहवालापैकी 47 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत . यात एक नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे . या रुग्णावर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे . हा रुग्ण 35 वर्ष वयाचा असून तो लोहार गल्ली नांदेड भागात राहतो . जिल्ह्यात आज डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील दोन रुग्ण , एनआरआय यात्री निवास कोविड सेंटर येथील एक रुग्ण , ग्रामीण रुग्णालय बिलोली येथील एक रुग्ण असे एकूण चार रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . आतापर्यंत 138 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 90 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . उर्वरित 43 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील दोन स्त्री रुग्ण वयवर्षे 52 व 55 यांची प्रकृती गंभीर आहे . गुरुवार 28 मे रोजी सांयकाळपर्यंतची कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे . सर्वेक्षण- 1 लाख 37 हजार 540 , घेतलेले स्वब 3 हजार 621 , निगेटिव्ह स्वब 3 हजार 132 , आज रोजी पॉझिटिव्ह स्वब संख्या -01 , एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 138 , स्वब तपासणी अनिर्णीत संख्या 141 , स्वब नाकारण्यात आलेली संख्या 14 , मृत्यू संख्या 7 , रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 90 , रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 41 , स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 192 एवढी आहे .काल बुधवार 27 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 73 स्वब तपासणी अहवाल रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होतील . तर गुरुवार 28 मे रोजी 119 रुग्णांचा स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे . त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळीपर्यंत प्राप्त होतील . एकुण 138 रुग्णांपैकी 7 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 88 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . 41 रुग्णांपैकी 06 रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड पंजाब भवन कोवीड केअर सेंटर , यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 21 रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5 , ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 1 रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय गोंकुदा येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 4 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहेत . सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य : स्थितीत स्थिर आहे . नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल . आज दिवसभरात 1 पॉझिटिव रुग्णांची भर दिवसभरात 4 रुग्णांना सुट्टी एकूण रुग्ण संख्या 138 वर . आत्तापर्यंत 90 बरे होऊन घरी 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार . 7 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू . 43 रुग्णांवर उपचार सुरू . दोन महिला रुग्णांची प्रकृती चिंताजनक
29 May 2020
Home »
» लोहार गल्लीत आढळला आणखी एक रुग्ण , बिलोलीच्या एका रुग्णाला सुट्टी , आता पर्यंत 90 बरे होऊन घरी .







0 comments:
Post a Comment