जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

10 May 2020

मोफत बससेवेसंबंधी गोंधळाची परिस्थिती !

नांदेड:– मागीच्या अनेक दिवसांपासून अडकून पडलेले मजूर, विस्तापित कामागर,पर्यटक, यात्रेकरू व विद्यार्थ्यांना उद्यापासून सुरु होणार्‍या बस सेवेचा लाभ मिळणार असल्याचे परिहवन मंत्री अनिल परब यांनी सांगितले होते.मात्र यातील काही अटी व शर्तीमध्ये बदल झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जिल्हाअंतर्गत प्रवासाला मुभा देण्यात आली आहे, की नाही याबद्दल गोंधळाची परिस्थिती निर्माझ झाली, असून जिल्ह्यात असलेल्या परराज्यातील मजूरांनाच त्या-त्या राज्याच्या सिमेपर्यंत सोडले जाणार आणि त्या राज्यातील आपल्या राज्यांच्या मजूरांना घेऊन येणार असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन टाळेबंदीमध्ये अडकलेल्या मजूर, विस्थापित कामगार, पर्यटक व विद्यार्थी अशांना त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग सुकर झाल्याचे पत्र परिषद घेऊन सांगितले होते.मात्र सदरचा प्रवास हा आंतरराज्य मजूर, पर्यटक, विस्तापित कामगार व विद्यार्थ्यांसाठीच असल्याचे सांगितले.यासंबंधी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनची प्रेसनोट आली आहे. यामध्ये असे स्पष्ट करण्यात आले, की लॉकडॉऊन कालावधीमध्ये राज्यातील मजूरांना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मोफत सुविधा देण्यासाठी दि. 9 मे रोजी शासन निर्णय झाला, असून या निर्णयाव्दारे देण्यात येणार्‍या मोफत बससेवा ही इतर राज्यातील जे मजूर व इतर नागरिक हे महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी अडकून पडले आहेत, अशांना महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत आणून सोडणे, तसेच महाराष्ट्राचे मजूर व इतर नागरिक हे इतर राज्यात अडकून पडले, ते राज्याच्या सिमेवर आले आहेत. अशांना महाराष्ट्रातील जिल्हयांपर्यंत पोहचविले जाणार आहे. मात्र या प्रेस नोटवर एकाही सक्षम अधिकार्‍याची स्वाक्षरी नसल्याने परिहवन महामंडळाच्या अधिकार्‍यांचाही गोंधळ उडाला आहे.परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलेली माहिती व प्रेसनोटमधील माहिती यामध्ये तफावत आढळून येत आहे. महसूल प्रशासनाकडून परराज्यातील किती मजूर व नागरिक जाणार आहेत. याची माहिती आल्यानंतर किती गाडया सोडायच्या याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे परिवहन महामंडळातील एका अधिकार्‍याने सांगितले.मात्र त्या पत्रावर काही अधिकार्‍यांनी डोळयावर बोट ठेवले आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती प्रवाशी व परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.

0 comments:

Post a Comment