जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

05 May 2020

दिलासादायक नांदेडमध्ये आजचे सर्व अहवाल निगेटीव्ह…

नांदेड:– आठ दिवसांपासून कोरोनाच्या संख्येत होणार्‍या वाढीमुळे नांदेडकरांना चक्रावून सोडल होते. ज्या संशयितांचे अहवाल पाठविण्यात आले होते.अशांचे मंगळवार दि. 5 मे रोजी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे नांदेडकरांमधून समाधन व्यक्त होत आहे.नांदेड शहरात पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण दि. 22 एप्रिल रोजी आढळून आला होता. मात्र पंजाब येथे यात्रेकरूंना सोडून आलेल्या काही चालकांना कोरोनाची लागण झाली. त्याचसोबत पंजाब येथून खासगी टॅ्रव्हल्स घेऊन आलेल्या चालकांमुळे ही नांदेडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गुरुव्दारामधील कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाचे संसर्ग आढळून आले. त्यामुळे एक मे पासून ते चार मे या चार दिवसांच्या काळात रुग्ण संख्येत वाढ झाली. त्यामुळे नांदेडची रुग्णसंख्या 34 वर गेली. यात तिघांचा यापूर्वीच मृत्यू झाला. तर 31 कोरोनाबाधितांमध्ये चार जण अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.शहरातील रहमतनगर येथे राहणार्‍या एक 48 वर्षीय महिलेचा मृत्यू 2 मे रोजी झाला. या महिलेच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील चाळीस कर्मचार्‍यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व अहवाल कोरोना निगेटीव्ह आले आहेत.तसेच राजस्थान येथील कोटा येथून आलेल्या 24 विद्यार्थ्यांचे ही अहवाल दि. 3 मे रोजी पाठविले होती. ते सुद्धा अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मात्र शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय येथून 9 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांचा अहवाल पंजाब राज्यात पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णालय विष्णुपुरी व कोविड केअर सेंटर पंजाब भवन येथे उपचार सुरु असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी सांगितले.नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 354 जणांचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये एक हजार 238 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले. 57 जणांचा अहवाल प्रलंबित आहे. पाच जणांचे अहवाल तपासण्याची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा आरोग्य प्रशासनाने दिला.

0 comments:

Post a Comment