जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

12 May 2020

नांदेड मध्ये दहा नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

नांदेड :आरोग्य सेतू अॅपची १ लाख ६४ हजार ४५५ लोकांनी केली नोंदणी नांदेड - ( प्रतिनिधी ) कोरोना विषाणू संदर्भात दि . १२ मंगळवारी प्राप्त २४ अहवालानुसार मुदखेड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथील एक नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे . तर २३ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत एकुण ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . नांदेड जिल्ह्यात आज १२ मे पर्यंत आरोग्य सेतू या अॅपची १ लाख ६४ हजार ४५५ लोकांनी नोंदणी केली असून या अॅपचा फायदा कोरोना प्रादुर्भाव पासून बचाव करण्यासाठी होत आहे . जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये “ आरोग्य सेतू अॅप ” डाऊनलोड करुन घ्यावा , जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या अॅपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळते , असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . एन . आय . भोसीकर यांनी केले आहे . मंगळवार १२ मे रोजी सायं ५ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी , प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे १ लाख ६९८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील २ हजार २ रुग्णांचे स्वब घेण्यात आले आहेत . त्यापैकी १ हजार ७३० स्वब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून १८८ व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे . यात घेतलेल्या स्वबपैकी एकुण ५३ रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . या ५३ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १२ रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड , व पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे ३३ रुग्णांवर आणि ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्या . . प्रकृती स्थिर आहे . आतापर्यंत औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे . पॉझिटिव्ह ५ मृत्यू झालेले रुग्ण हे रक्तदाब , मधुमेह या आजाराने बाधित होते . त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी . कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेनी मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे , असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर यांनी केले आहे . 

0 comments:

Post a Comment