नांदेड:– कोरोनाचा संसर्ग आढळून आल्याने उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्यांपैकी 22 जण हे कोरोनामुक्त झाले, असून या सर्वांना जणांना सुट्टी देण्यात आली आहे. या कोरोनामुक्त झालेल्या 22 जणांना मात्र पुढचे सात दिवस निगराणीखाली राहावे लागणार असून त्यांची आरोग्य यंत्रणेकडून रोज विचारणा केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली.मागच्या महिन्यात पंजाबे येथे यात्रेकरुंना घेऊन गेलेल्या चालक व पंजाबवरून आलेल्या चालकांमुळे शहरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. आतापर्यंत 63 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. यात 5 जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला.दोन जण गायब, असून 56 जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व एन.आर.आय. कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहेत. त्यातील 22 जण कोरोनामुक्त झाल्याने 34 जणांवर उपचार सुरु आहेत.
कोविड केअर येथे उपचार घेत असलेल्या 42 जणांपैकी 22 जणांना कोरोनामुक्त झाले म्हणून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या बावीस जणांना सर्दी, ताप,खोकला व श्वासनाचा त्रास नसल्याने सुट्टी देण्यात आली आहे. यातील ते परराज्यातील आहेत. अशांच्या राहण्याची व्यवस्था गुरुव्दारा परिसरात करण्यात आली. पाच दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना जाता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.बावीसमध्ये वीस जण परराज्यातील
आज ज्या बावीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील वीस जण परराज्यातील आहेत. तर दोन जण नांदेड शहरातील असल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश बिसेन यांनी सांगितले. या वीस जणांना पाच दिवस निगराणीखाली ठेवण्यात आले, असून त्यांच्या राहण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात आल्याचे ते म्हणाले.34 जण रुग्णांवर उपचार सुरु उपचार सुरु असलेल्या रुग्णांमध्ये पंजाब भवन येथे 6, एन.आर.आय. कोविड केअर सेंटर-15, महसूल इमारत -9 व मेडिकल कॉलेज 3 व बारड धर्माबाद शाळा येथे 1 जण असे 34 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती डॉ. सुरेश बिसेन यांनी दिली.







0 comments:
Post a Comment