जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

01 May 2020

हिंगोली येथील सीआरपीएफ चे नवे पंचविस जवान कोरोना पॉझिटीव्ह

हिंगोली, : येथील राज्य राखीव पोलिस दलातील 25 जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटीव्ह आले आले आहेत. हिंगोली येथे कोरोनाची लागण झालेल्या जवानांची संख्या 41 व इतर चार रुग्ण असे 45 जणांचा समावेश कोरोनबाधित म्हणून झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व मुंबई येथे बंदोबस्तावरून आलेल्या हिंगोली कॅम्पमधील अकरा जवानांना कोरानाची लागण पहिल्या टप्यात झाली होती. त्यानंतर कोरोना झालेल्या जवानांची संख्या वाढतच असून शुक्रवारी आलेल्या अहवालामध्ये नव्या 25 जवानांची भर पडली आहे. यामध्ये मालेगाव येथून आलेल्या 33 तर मुंबई येथून आलेले 8 जवान आहेत.आखाडा बाळापूर येथील एक पंचविस वर्षीय चालक दि. 23 एप्रिल रोजी नांदेड येथून भाविकांना सोडण्यासाठी पंजाब येथे गेला होता. या चालकास दि. 28 रोजी क्वॉरंटाईन करण्यात आले होते. या चालकाचा अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटीव्ह आला आहे. या व्यक्तीवर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकूण 47 रुग्ण कोविंड-19 चे रुग्ण झाले आहेत. त्यातील एक जण निगेटीव्ह झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.46 सध्यास्थित पॉझिटीव्ह आहेत.एक रुग्ण नांदेड येथे तर एक रुण्ण औरंगाबाद येथील धूत हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे.

0 comments:

Post a Comment