भोकर: पोलीस ठाण्यात गेली २ वर्ष अतिशय उत्कृष्ट व न्यायीक कर्तव्य सेवा बजावणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे यांची पोलीस ठाणे गंगाखेड जि.परभणी येथे बदली झाली आहे.या औचित्याने आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या वतीने कर्तव्यपुर्ती गौरव पाठवणी कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पो.उप.नि.दिगांबर पाटील, ताईंचे पती अरुण बर्डे,पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वांनी पो.उप.नि.राणी भोंडवे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्याना पुढील कर्तव्य सेवेसाठी आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,सचिव प्रा.आर.के.कदम,उपाध्यक्ष विजयकुमार चिंतावार,कमलाकर बरकमकर,कोषाध्यक्ष बालाजी कदम पाटील,सहसचिव विठ्ठल सुरलेकर, पदाधिकारी गजानन गाडेकर, अंबादास बोयावार,विशाल जाधव,पोलीस नायक सय्यद मोईन यांसह आदी जणांची उपस्थिती होती.







0 comments:
Post a Comment