जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

27 August 2023

उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांचं प्लॅनिंग, स्वागताला २१ जेसीबी आणले, पोलिसांचा एक निर्णय अन्...

नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज हिंगोली मध्ये सभा पार पडणार आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरे हे मुंबईहून नांदेड विमानतळावर दाखल होऊन हिंगोलीला पोहोचले आहेत. नांदेडमध्ये शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी जंगी प्लॅनिंग केलं होतं.शिवसैनिकांनी केलेल्या संपूर्ण प्लॅनिंगवर पोलिसांच्या एका निर्णयानं पाणी फेरलं. यामुळं शिवसैनिकांचा हिरमोड झाला. नांदेडमधील शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी राजकीय दबावातून असा निर्णय घेतला गेल्याची टीका केली आहे.शिवसैनिकांची जंगी स्वागताची तयारी पण
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज हिंगोलीत सभा होणार आहे. यासभेला नांदेडमार्गे जाण्यासाठी उद्धव ठाकरे नांदेड विमानतळावर येणार होते. त्यामुळं शिवसैनिकांकडून ठाकरेंच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली होती. नांदेडच्या शिवसैनिकांनी ठाकरेंच्या स्वागतासाठी २१ जेसीबी आणण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी याला परवानगी न दिल्यानं शिवसैनिकांना वेगळा निर्णय घ्यावा लागला.जेसीबी परत पाठवण्याची वेळ
पोलिसांनी ठाकरेंच्या स्वागतासाठी आणलेल्या जेसीबींच्या वापराला परवानगी न दिल्यानं शिवसैनिकांना सर्व जेसीबी माघारी पाठवावे लागले. पोलिसांनी विमानतळाबाहेरील जेसीबीद्वारे करण्यात येणाऱ्या स्वागताला परवानगी नाकारली. यामुळं जेसीबी परत पाठवण्यात आले.दबावामुळं परवानगी नाकारल्याचा आरोप
नांदेडमधील शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी राजकीय दबावातून परवानगी नाकारण्यात आल्याचा दावा केला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नांदेड विमानतळावर येणार आहेत. याच कारणातून परवानगी नाकारल्यात आल्याचा आरोप शिवसेनेने सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी केला आहे.

0 comments:

Post a Comment