कुंडलवाडी:शहरातील राम मंदिर भागातील गंगाधर बोधनकर यांच्या घरी आईस अज्ञात आरोपीने निराधाराचे पैसे आले सांगुन घरात प्रवेश करून सही करा असे सांगत चाकुचा धाक दाखवून कानातील ७ ग्रॅम सोन्याचे नागुल नावाचे दागिने अंदाजे किंमत २० हजार रुपयाचे जबरीने लुटून नेल्याची घटना दि .२४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे . या भरदिवसा घडलेल्या घटनेने शहर व परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे . गेल्या तीनच दिवसांपुर्वी शहरातील महालक्ष्मी मंदिराजवळ मुरकुल कारखान्यात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून ३ हजार रूपयांची चोरी केल्याची घटना ताजी असतानाच २४ ऑगस्ट रोजी भर दुपारी चाकुचा धाक दाखवून २० हजार किंमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.याप्रकरणी गंगाधर पोशट्टी बोधनकर यांच्या फिर्यादीवरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुरनं ९ ७ / २०२० कलम ३ ९ २ , भादवि कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि सुरेश मांटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी हे पुढील तपास करीत आहेत .
26 August 2020
Home »
» कुंडलवाडीत भरदिवसा चाकूचा धाक दाखवून 20 हजार रुपयांचे दागिने लुटले







0 comments:
Post a Comment