नांदेड दि . 29 : - चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली ही शरिराला मिळणाऱ्या व्यायामात दडलेली असते . हे लक्षात घेता चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास स्वत : च्या आरोग्यासाठी देऊन जमतील तसे खेळ खेळणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी सांगितले . कोविड -19 च्या या वातावरणात प्रत्येकाला आपल्या घराच्या परिसरात असलेल्या जागेवरही आरोग्याच्यादृष्टिने व्यायाम करता येऊ शकतो , असे त्यांनी स्पष्ट केले . मेजर ध्यानचंद ( हॉकीचे जादुगर ) यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो . त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल , नांदेड येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला . यावेळी ते बोलत होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीस मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले . या कार्यक्रमासाठी मनपा आयुक्त डॉ . सुनिल लहाने , शिवछत्रपती पुरस्कारार्थी रामलु पारे , शिवछत्रपती पुरस्कारार्थी जनार्धन गुपीले नांदेड सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष निखील लातुरकर , डॉ . पालिवाल , जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार आदि मान्यवर उपस्थित होते .नवी दिल्ली युवा व खेल मंत्रालयांनी “ फिट इंडिया फ्रीडम रन ” हा उपक्रम देशभरात राबविण्याचे निर्देश दिले आहेत . त्यानुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्यामार्फत राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्हयात हा उपक्रम राबविण्यात येत आहे . त्यानुषंगाने नांदेड जिल्हयात " फिट इंडिया फ्रीडम रन " हा उपक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नांदेड जिल्हा सायकलिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करुन फिट इंडिया फ्रीडम रन या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांच्या हस्ते " फिट इंडिया फ्रीडम रन ” फलेक्सचे रिबीन कापून शुभारंभ करण्यात आला . या सायकल रॅलीमध्ये स्वत : जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर व मनपा आयुक्त डॉ . सुनिल लहाने यांच्या बरोबर शासकीय अधिकारी , कर्मचारी व सायकलपटू यांनी सहभाग घेतला . या रॅलीचा शुभारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथून जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल - आयटीएम कॉलेज आयटीआय - श्रीनगर - वर्कशॉपकॉर्नर - भाग्यनगररोड आनंदनगर - वसंतराव नाईक चौक ( नागार्जुना ) -अण्णाभाऊ साठे चौक - व्हीआयपी रोड - आयटीएम मार्गे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला . हा कार्यक्रम सामाजिक अंतराचे पालन करुन यशस्वी करण्यात आला . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा अधिकारी किशोर पाठक यांनी केले तर आभार गुरुदिपसिंघ संधु यानी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर , राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख ,अनिल बंदेल , वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड , रमेश चवरे , सायकलींग संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर सोनसळे व त्यांचे सहकारी आणि संजय चव्हाण आदिंनी सहकार्य केले .
29 August 2020
Home »
» सुदृढ आरोग्यासाठी दररोज एक तास खेळ आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर







0 comments:
Post a Comment