नायगाव :कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द आहेत . त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा साजरा होणारा वाढदिवस कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे . त्यामुळे कार्यकर्ते व हितचिंतकांनी वाढदिवसाला प्रत्यक्षात न भेटता , कोणतेही हार - तुरे न आणता घरातच सुरक्षित राहून वाढदिवसानिमित्त सुरक्षित अंतर राखून अभिष्टचिंतन करावे , असे आवाहन माजी आ.वसंतराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आलेआहे १५ ऑगस्ट हा माजी आ.वसंत चव्हाण यांचा वाढदिवस दरवर्षी प्रमाणे यंदाही मित्रमंडळाच्या वतीने विविध धार्मिक , सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार होता . परंतु राज्यातील परिस्थिती बघता कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे . नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे . वाढदिवसानिमित्त नायगाव येथील पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत . खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे व नियमांचे पालन करून हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा न देता आपल्या घरीच सुरक्षित राहून अभिष्टचिंतन करावे .विनाकारण घराबाहेर न पडता घरीच सुरक्षित राहा , मास्क चांगले वापरा , स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी , असे आवाहन माजी आमदार वसंत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्ते व हितचिंतकांना केल्याचे मित्रमंडळाने कळविले आहे .
15 August 2020
Home »
» वसंतराव चव्हाणाच्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द







0 comments:
Post a Comment