नायगाव: तालुक्यातील मांजरम येथील शिवराज रामचंद्र भंडारवाड यांना सन 2019 चा जीवनरक्षा पदक पुरस्कार घोषित झाला आहे . इयत्ता 10 मध्ये शिकणाऱ्या या बालविराने स्वत : च्या जीवाचा पर्वा न करता जिगरबाज कामगिरीने पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन व्यक्ती व 40 शेळयांचा जीव वाचविण्याचे शौर्य दाखविले आहे . या बालविराला हा पुरस्कार आज डॉ . शंकरराव चव्हाण नियोजन भवनात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे . या पुरस्कार वितरणाच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर , मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर , मनपा आयुक्त डॉ . सुनिल लहाने , निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . सचिन खल्लाळ , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.पी. काळम , सहाय्यक लेखा अधिकारी , जी आर धुमे , परिविक्षा अधिकारी बी.पी. बडवणे यांची उपस्थिती होती . भारत सरकार , केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जीवनरक्षा पदक पुरस्कार शिवराज रामचंद्र भंडारवाड यांना घोषित झालेला होता . या पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र , पदक व 1 लाख रुपयाचा धनादेश असे आहे . हा पुरस्कार ज्या मुलांनी शिक्षण , कला , सांस्कृतिक कार्य , नाविण्यपुर्ण शोध , सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे , त्यांना दिला जातो . त्यांच्या या धाडसाचे कौतुक व्हावे व समाजातील इतर बालकांनाही त्याच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार महत्वाचा आहे.
06 October 2020
Home »
» सन 2019 चा जीवनरक्षा पदक पुरस्कार पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान







0 comments:
Post a Comment