बिलोली- तालुक्यातील कुंडलवाडी नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ.सौ.अरुणा कुडमुलवार यांना शासनाने जातवैधता प्रमाणापत्रा अभावी अपात्र केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सदस्यांमधून नगराध्यक्ष पदाची पोट निवडणूक जाहीर केली .
त्यानुसार 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या पोट निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ . सुरेखा नरेंद्र जिट्टावार यांची निवड झाली असून त्यांनी भाजपच्या सौ.रेहाना बेगम पाशामिया यांना पराभूत केले आहे . कुंडलवाडी नगर परिषदेची पोट निवडणूक ही सदस्यामधून झाली नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव होते.आज झालेल्या सभेत सौ . जिट्टावार यांना 10 मते सौ रेहाना बेगम यांना 6 तर एक सदस्यांना कुणालाही मतदान न करता तटस्थ भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीच्या शिवसेना उमेदवार सौ सुरेखा जिट्टावार यांची निवड झाली आहे .या निवडणुकीत आ . अमरनाथ राजूरकर हे किंगमेकर ठरले असून शिवसेनेचे सुभाष साबणे , माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी , शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे , प्रकाश मारावार , माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार , मनपानगरसेवक संदीप सोनकांबळे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे .







0 comments:
Post a Comment