नांदेड : - प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सन 2020-21 या रब्बी हंगामासाठी पिकविमा प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले असून रब्बी ज्वारीसाठी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 तर गहु बागायती , हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2020 ही अंतिम मुदत आहे . जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी केले . प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात इफ्कोटोकीयो कंपनीची पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे . या इफ्कोटोकीयो कंपनीच्यावतीने जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीच्या चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर . बी . चलवदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन या मोहिमेला सुरूवात झाली . यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी रामराव पवार इफ्कोटोकीयोचे जिल्हा प्रतिनीधी गौतम कदम जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नादरे , कृषि विज्ञान केंद्राचे संशोधक श्री . गिरी , तंत्र अधिकारी प्रमोद गायके हे उपस्थित होते .
26 October 2020
Home »
» रब्बी हंगामातील पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर







0 comments:
Post a Comment