बिलोली:मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने हाथरस येथे घडलेल्या 19 वर्षीय मुलीवर झालेल्या आत्याचार च्या विरोधात बिलोली तहसिल कार्यालय येथे आज दि 5 ऑक्टोबर रोजी निषेध व्यक्त करण्यात आला तसेच पिढीत मुलीच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. अशी घटना घडू नये यासाठी कायदा पुन्हा कडक करण्यात यावा. सदरील घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी. तसेच उत्तर प्रदेश सरकार व पोलीस प्रशासन याच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. या पिडीत कुटूबीयांना लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा, अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा आज तहसिलदार यांना निवेदन देऊन करण्यात आला या वेळी मानवहीत लोकशाही पक्षाचे बिलोली तालूका अध्यक्ष विजय भरान्डे,बिलोली तालुका प्रवक्ते साहेबराव दावलेकर,विद्यार्थी आघाडी बिलोली ता.उपाध्यक्ष गंगाधर बोईवार,सामाजिक कार्यकर्ते मुकिंदर कुडके,सामाजिक कार्यकर्ते सखाहरी घायाळ,शामराव भरान्डे,बालाजी मोरे यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.
05 October 2020
Home »
» हाथरस येथील घटनेचा मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने बिलोलीत तिव्र निषेध







0 comments:
Post a Comment