जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

11 July 2020

बिलोली तालुक्यातील चिंचाळा गावातील सार्वजनिक ठिकाणे सिल

बिलोली : कोरोना वाढू नये यासाठी प्रतिबंध करण्यात येवून योग्य ती काळजी चिंचाळ्यात घेतली जात आहे . सहसा कामाव्यतिरिक्त घराबाहेर कोणी पडत नाही . बिलोली येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कातून चिंचाळा येथील ३५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले . दोघेही समव्यवसायिक असल्याने त्यांच्या संपर्कातून ही बाधा झाली असली तरी या प्रकाराने मात्र f चिंचाळा येथे खळबळ माजली असून नागरिकांची झोप उडाली आहे . मागील तीन महिने कमालीची ग खबरदारी घेतलेल्या चिंचाळकरांपर्यंत f अखेर बिलोलीमार्गे कोरोना ग्र पोहोचलाच . मंगळवारी सकाळी लोहगाव f येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी व अधिकारी चिंचाळ्यात दाखल झाले . ग्रामसेवक जी.व्ही.इबिते यांनी आरोग्य विभागाच्या सूचनेवरून गावातील मुख्य बैठकीचे सार्वजनिक ठिकाणे , हॉटेल्स , मंदिर परिसर , ग्रामपंचायत परिसर , सील केला असून तो परिसर प्रतिबंधितही केला . हे ठिकाण एरव्ही गजबजलेले असायचे . नित्यनियमाने होणारा येथील मंदिरातला हरिपाठाचा गजर व चावडीवरच्या गप्पा आता बंद झाल्या . तर मुख्य रस्त्याशेजारी असणाऱ्या घरासमोर बसण्यासाठी केलेले आसने , ओटे , कठडे यावर संबंधितांकडून काटेरी पालवे टाकून स्वयंस्फूर्त बंद करण्यात येत आहे . ग्रामपंचायत स्तरावर जंतूनाशक फवारणी तीन दिवसांपासून सातत्याने केली जात आहे .

0 comments:

Post a Comment