बिलोली : कर्नाटक राज्यातील औराद येथील कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्यांच्या संपर्कात आलेल्या बिलोली शहरातील आजी - नातू कोरोना बाधित पाठोपाठ दोन भाडेकरु तर आरळी व चिंचाळा असे सात पॉझिटिव्ह असतानाच कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या चालकाच्या संपर्कात आलेल्या कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे एक अधिकारी , बिलोली येथील ज्येष्ठ पत्रकार , मयत कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील वाहन चालक तसेच आरळीच्या बाधित रुग्णाचा भाऊ असे ४ बाधित रुग्ण आढळले आहेत . या चौघांनाही नगरपरिषदेतील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले असून संपर्कातील नागरिकांचे स्वब अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे नोडल ऑफीसर डॉ.सतीष तोटावार यांनी दिली .







0 comments:
Post a Comment