जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

16 July 2020

वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त

बिलोली :कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आले आहे.नागरीकांनी घराबाहेर पडू नये म्हणून बाजारपेठ सुद्धा बंद करण्यात आले आहे.नागरीक जास्त  बाहेर फिरणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे.गाडीवर एका पेक्षा अधिक नागरीक आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून दंड आकारला जात आहे.एवढ कडक बंदोबस्त असताना सुद्धा लॉकडाऊनची संधी साधून रेती माफिया रेतीची वाहतूक करण्यासाठी तत्पर असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील कासराळी शिवारातील नाल्यातून १ ब्रास वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला बिलोलीच्या महसूल पथकाने नाल्यातच पकडले . सोमवारी दुपारी वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच नायब तहसीलदार अनिल परळीकर , उत्तम निलावाड यांनी तलाठ्यासह नाला गाठून उपरोक्तप्रमाणे ट्रॅक्टर पकडला . या कारवाईत तलाठी मोताळे , कासराळीचे तलाठी बिराजदार , काळे यांनीही सहभाग नोंदविला . रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला .

0 comments:

Post a Comment