जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

05 July 2020

दिवसभरात अकरा रुग्ण बरे

नांदेड:कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांची संख्या घटत आहे. रविवार दि. 5 जुलै रोजी 11 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे घरी परतले आहेत. 428 रुग्णांमधून 20 दगावले तर 321 जण घरी परतले.कोरोनाच्या दृष्टीने रविवारची सकाळी धक्का देणारी ठरली. दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये बिलोली येथील 65 वर्षीय महिला व देगलूर येथील 53 वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला. त्याचसोबत 59 अहवालांपैकी 52 अहवाल निगेटीव्ह तर पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. यात उमरी कॉलनीमधील 32 वर्षीय पुरुष, हबीबिया कॉलनीतील 24 वर्षीय महिला, नांदेड तालुक्यातील हस्सापुर येथील 65 वर्षीय पुरुष तर हिंगोली येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 87 झाली आहे.कोरोनावर मात करणार्‍या 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये देगलूर कोविड केअर सेंअर येथील 01, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 09 व सोलापुर येथील संदर्भीत पाच वर्षीय बालकाने सुद्धा कोरोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांची संख्या 321 झाली आहे.

0 comments:

Post a Comment