बिलोली - कर्नाटक राज्यातील औराद येथिल कोरोना पाॅझिटीव निघालेल्या दांपत्याच्या संपर्कात आलेल्या बिलोली शहरातील गांधीनगर येथे राहणाऱ्या आजी - नातु या दोघांचा अहवाल दि .3 जुलै रोजी रात्री उशिरा कोरोना पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्या कोरोना बाधितांसोबत पत्ते पिसणाऱ्याना २ ९ जणांना क्वारंटाईन करून त्यांच्ये स्वॅबचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले होते.त्याचे अहवाल प्रलंबित असतानाच 5 जुलै रोजी सकाळी आलेल्या अहवालामध्ये बिलोली येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर तिचा मृत्यू झाला त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.कोरोना दक्षता समिती चे विजय कुंचनवार यांनी वेळीच दखल घेऊन जनता कर्फ्यू चा स्वयंस्फूर्त निर्णय घेतला.बिलोलीतील तिन दिवस म्हणजेच शनिवार ,रविवार, सोमवार ,जनता कर्फ्यू करण्यात आले आहे.शहरातील अत्यावश्यक सेवा खाजगी दवाखाना व औषधी दुकाने वगळता सर्व व्यापार बंद आहे. त्यामध्ये नागरीकांनी व व्यापारी चांगला प्रतिसाद देत आहेत. तसेच विजय कुंचनवार यांनी त्या 27 होमकॉरन्टाईन व्यक्तीना आपल्या स्वतःच्या फार्म हाउस मध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे त्यांच्या कार्याची शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे बिलोलीकराना थोडासा दिलासा मिळाला आहे.तसेच त्या दोन पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील आणखी 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत त्यांचे अहवाल येणे बाकी आहे.
06 July 2020
Home »
» बिलोलीतील त्या 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आणखी 43 जणांचे अहवाल येणे बाकी







0 comments:
Post a Comment