नांदेड दि . 4 : - कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 310 व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत . शनिवार 4 जुलै रोजी प्राप्त अहवालात 68 अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले तर 9 नवीन बाधित व्यक्ती आढळले . जिल्ह्यात एकूण बाधित व्यक्तीची संख्या 423 एवढी झाली आहे . नवीन बाधितांमध्ये गणेशनगर येथील 63 वर्षाची 1 महिला , देगलूर येथील 57 वर्षाचा 1 पुरुष , आंबेडकरनगर येथील 50 वर्षाचा 1 पुरुष , अशोकनगर येथील 54 वर्षाचा 1 पुरुष विष्णुपुरी नांदेड येथील 31 वर्षाची 1 महिला , बिलोली येथील 71 वर्षाची 1 महिला , 33 वर्षाचा 1 पुरुष , मुखेड तालुक्यातील दापका येथील 32 वर्षाचा 1 पुरुष , लातूर जिल्हा अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथील 49 वर्षाचा एका पुरुषांचा यात समावेश आहे . सद्यस्थितीत या सर्व बाधित व्यक्तींवर उपचार सुरु आहेत . आतापर्यंत 423 बाधितांपैकी 310 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . उर्वरीत 95 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत . यातील 11 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे . यात 5 महिला व 6 पुरुष बाधिताचा समावेश आहे . नांदेड जिल्ह्यात 95 बाधित व्यक्तींमध्ये डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 31 बाधित , पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 43 बाधित तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 2 , देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1 , हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 3 , बिलोली कोविड केअर सेंटर येथे 2 , नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात 1 बाधित व्यक्ती उपचार घेत आहे . तर 10 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत . शनिवार 4 जुलै रोजी 116 व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल . जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे . सर्वेक्षण -1 लाख 45 हजार 128 , घेतलेले स्वब -6 हजार 829 , निगेटिव्ह स्वब- 5 हजार 849 , आज पॉझिटिव्ह स्वब संख्या- 9 , एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 423 , आज स्वब तपासणी अनिर्णीत संख्या- 16 , आज स्वब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक , 18 , रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या -310 , रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 95 , स्वब तपासणी चालू व्यक्तींची 116 एवढी संख्या आहे . कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये . आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतृ अॅप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे अॅप सतर्क करेल , असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर यांनी केले आहे .
04 July 2020
Home »
» कोरोनातून 4 व्यक्ती झाले बरे आज नवीन 9 व्यक्ती बाधित







0 comments:
Post a Comment