जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

10 July 2020

मुलगा झाल्याच्या आनंदात वाटले पेढे ... अन् तो निघाला कोरोना पॉझिटिव्ह ... !

कंधार: तालुक्यातील काटकळंबा गावात तरुणाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आसल्याने खळबळ निर्माण झाली होती . विशेष बाब म्हणजे या व्यक्तिने मुलगा झाला असल्याने गावातील नागरिकांना आंनदाच्या भरात पेढे वाटप केले . या घटने नंतर बाधिताच्या हातुन पेढे खाणाऱ्या , संपर्कात आलेल्या ११६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याचि माहीती दि . ८ बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र बारुळचे वैद्यकीय अधिकारी डॉ . योगेश दुल्लेवाड यांनी दिली . औरंगाबाद येथून चार जुलैला मुलगा झाला म्हणून मुलाला पाहण्यासाठी आलेला वडीलच कोरोनाबाधित असल्याचं समोर आल्या नंतर काटकळंबावासियांची झोप उडाली आहे . हा तरुण औरंगाबाद येथील एका कंपनीत काम करणारा विवाहित तरूण आहे , दिनांक ४ जुलैला आपल्याला मुलगा झाला म्हणून पाहण्यासाठी गावाकडं आला होता . तोच आता कोरोनाबाधित आढळला आहे . काटकळंबा तालुका कंधार येथे एक रुग्ण कोरोना बाधित निघाला त्याचे ( वय २४ वर्ष ) बाधित आढळल्याने काटकळंबा वाशी या सह परिसरात खळबळ उडाली प्रशासकीय यंत्रणेने आता खबरदारीची उपाय म्हणून परिसर सील केला आहे गावात आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम व पोलीस , सरपंच पोलिस पाटील , तंटामुक्ती अध्यक्षासह सामाजिक टीमचा राबता वाढला आहे . न्हाव्याकडे संपर्क झाल्यामुळे नऊ जणाला कंधार येथे स्वबसाठी हालविण्यात आले आहे . रुग्णांच्या घराचा परिसर कंटेंन्मेट झोन सील करण्यात आला आहे . तर ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचे काम तातडीने चालू केले आहे . गावात भीतीचं वातावरण पसरू नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे . नागरिकांनी घाबरून जाऊ नये , आरोग्य यंत्रणाही तत्पर आहे . बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी , अफवेवर विश्वास ठेऊ नये . तातडीचे काम असेल तरच घराबाहेर निघावे . मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा , सोशल डिस्टन्स पाळावे , असे आवाहन डॉ . योगेश दुल्लेवाड वैद्यकीय अधिकारी , प्रा.आ.केद्र बारुळ यांनी केले आहे .

0 comments:

Post a Comment