नांदेड दि .7 : - कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात मिशन ब्रेक द चेन अंतर्गत ( Mission break the chain ) आदेश निर्गमीत केले आहेत . या आदेशाची जिल्हाभर कडक व काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून दोषींविरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल आज निर्गमीत केलेल्या आदेशान्वये 31 जुलै 2020 पर्यंत नांदेड जिल्ह्यातील नागरी , ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्या अधिन राहून आस्था पना व दुकाने केवळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंतच चालू ठेवण्याधस मुभा देण्यानत आली आहे . अत्यावश्यक साधने व सुविधा यांनी साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध सर्वसंबंधित यंत्रणांमार्फत कठोर कारवाई केली जाईल . नांदेड जिल्हयात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांवची संख्या विचारात घेता निर्गमीत आदेशाची काटेकोर अंमलबजावणी काही ठिकाणी होत नसल्यादचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे . याचबरोबर काही लोक दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन करत असल्याने जनतेमधूनही दिलेली शिथीलता पुर्णता बंद करुन 100 टक्के ताळेबंदी करण्यालची मागणी होत आहे . या बाबीचा गांभीर्याने विचार करुन जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या निर्देशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी खास पथके तयार करुन ठिकठिकाणी तपासणी पथक निर्माण केली आहेत . या पथकांमार्फत जिल्ह्यात सर्व निर्देशाचे तंतोतंत पालन जर कोणी केले नाही तर अशा तपास पथकांना आढळलेल्या व्यक्तीविरुद्ध आवश्यक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे . महानगरपालिका हद्दीत आयुक्त नांदेड , पोलीस अधीक्षक , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी नांदेड नगरपालिका - नगरपंचायत हद्दीत उपविभागीय दंडाधिकारी , उपविभागीय पोलीस अधिकारी , तहसिलदार , मुख्यारधिकारी , पोलीस निरीक्षक . ग्रामपातळीवर ग्रामपंचायत , तलाठी , पोलीस , कृषी सहाय्यक इत्या दींचा नवीन निर्माण केलेल्या वेगवेगळ्या पथकात समावेश राहील . :: सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीमध्ये जर दुचाकीवर एक व्यनक्तीला पेक्षा अधिक व्यकक्तीम आढळल्यास 500 रुपये पर्यंत दंड व मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनूसार इतर दंड व कारवाई केली जाईल तीन चाकी रिक्षा व इतर वाहनात तीन व्यवक्तीक पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्याळस 1 हजार रुपये पर्यंत दंड व मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार इतर दंड व कार्यवाही केली जाईल . चार चाकही वाहनामध्ये तीन व्यक्ती पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्याईस 1 हजार रुपये दंड , व मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनूसार इतर दंड व कार्यवाही .सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क् परिधान न केल्यास व सामाजिक अंतराचे पालन न केल्यास , सार्वजनिक ठिकाणी थुकल्या स 1 हजार रुपये दंड ठोठावला जाईल . ताळेबंदीच्याद कालावधी मुभा देण्यात आलेल्या विविध दुकानात पाच पेक्षा जास्त ग्राहक , दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्या चेहऱ्यावर मास्कि , सामाजिक अंतराचे पालन न झाल्यााचे आढळून आल्यायस रुपये 5 हजार रुपये पर्यंत दंड व सदरचे दुकानही पुढील पाच दिवसासाठी सिल करण्यात येईल . हातगाडेवरती फळ व भाजी विक्री तसेच इतर मुभा दिलेली वस्तू विक्री करणाऱ्यांना एकाच ठिकाणी थांबवून विक्री न करता त्यांइना मुभा दिलेल्या वेळेत गल्लीय , कॉलनी , सोसायटीमध्ये जावून विक्री करावी . एकाच ठिकाणी त्यांनी थांबवून विक्री केल्या स अशी वाहने , हातगाड्यांना 1 हजार रुपये दंड व वेळ प्रसंगी जप्तीनची कार्यवाही सुध्दा करण्यात येईल . अंतरराज्यन सिमेतून केवळ वैद्यकीय , अत्यंत तातडीच्यार कारणासाठी परवाना घेतलेल्या व्य क्तीं ना व मालवाहतूक वाहनांनाच प्रवेश असेल . ग्रामीण नागरी व औद्योगिक क्षेत्रात परदेशातून , परराज्यानतून व जिल्हीयाबाहेरुन प्रवास करुन आलेल्याठ व्यरक्तीकच्या बाबतीत यापुर्वी गठीत केलेल्याल अॅन्टीह कारोना कवच / फोर्सद्वारे खालील प्रमाणे कार्यवाही अनुसरण्यालत यावी . यात अशा व्यबक्तीलीची वैद्यकीय पथक येईपर्यंत गावातील समाज मंदिर शाळा इत्यावदी वेगळ्या ठिकाणी ठेवण्यातची व्ययवस्थात करावी . सदर व्यक्तीलची तात्का , ळ सबंधित वैद्यकिय अधिकारी यांचेमार्फत तपासणी करुन घेण्यात यावी . तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याई सल्यानुसार , सदर व्यचक्तीस प्रादुर्भावाची लक्षणे दिसून आली नसल्याअस त्याअस गृह अलगीकरण करावे किंवा तशी व्यवस्था नसल्यास त्यास नजीकच्याच कॅम्पआमध्ये किंवा गावातील समाज मंदिर , शाळा याठिकाणी राहण्याची व जेवणाची व्य्वस्थास करावी . तपासणीमध्ये प्रादुर्भावाची लक्षणे किंवा संशयास्प द स्थिती आढळून आल्यास त्यांचना तात्काथळ शासकिय विलगीकरण केंद्रात दाखल करावे . जिल्हचयातील सर्व खाजगी रुग्णाशलयात तसेच गल्लीरतील , कॉलनीतील व वसाहतीमधील जनरल फिजीशन यांनी त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये कोव्हिड -19 , सारी व ILI ( Influanza like illness ) सारखे लक्षण दिसून आल्या स तात्कालळ नजीकच्याा आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देवून सदर व्यक्ती स पुढील उपचारास त्यांचेकडे पाठवावे असे न केल्याआचे आढळून आल्यारस सबंधित डॉक्ट र विरुध्द n नियमानुसार कार्यवाही अनुसरली जाईल . रस्या गवे वर सार्वजनिक ठिकाणी विनाकारण व्याक्तीत , व्यक्तींचा समुह वावरत , फिरत असल्या चे दिसून आल्यालस त्यांच्या विरुध्दि भारतीय दंड संहिता 188 व इतर अधिनियमानुसार शिक्षेस पात्र धरले जाईल . वरिल प्रमाणे नमूद सर्व कार्यवाहीचे पर्यवेक्षणाचे काम कार्यक्षेत्राप्रमाणे सबंधित स्थानिक स्वाराज्यण संस्थाः प्रमुख , पोलीस विभाग , आरोग्यक विभाग महसूल विभाग यांची राहिल . या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्यास कृत्याकसाठी कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्दन कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यारच्याख अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हाणून 7 ते 12 जुलै 2020 पर्यंत वरील पथकामार्फत कडक अंमलबजावणी करण्या त यावी असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहे .
07 July 2020
Home »
» मिशन ब्रेक द चेन अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाय योजनेची कडक अंमलबजावणी







0 comments:
Post a Comment