नांदेड :जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक अद्यावत असे जिल्हा रुग्णालय संकुल निर्माण करण्याचा माझा मानस आहे . याचाच एक भाग असलेल्या 200 खाटांच्या नविन हॉस्पिटलचे लोकार्पण करतांना मला मनस्वी आत्मिक समाधान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले . श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकिय रुग्णालय येथील 200 खाटांच्या अद्ययावत बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचे व सी . टी . स्कॅन विभागाचे लोकार्पण आज त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी ते बोलत होते . शासकिय निमयामांच्या अंतर्गत निवडक उपस्थितीत छोटेखानी झालेल्या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंगाराणी अंबुलगेकर , आमदार अमर राजूरकर , आमदार बालाजी कल्याणकर , महापौर सौ दिक्षा धबाले , जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे , जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर , पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर , मनपा आयुक्त डॉ . सुनिल लहाने , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर अधिष्ठाता डॉ . चंद्रकांत म्हस्के , अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदि मान्यवर उपस्थित होते . नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या इतर इमारती या अत्यंत जीर्ण झाल्या असून याचा कायापालट करणे आवश्यक झाले आहे . जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत सहाय्यभुत ठरणारे येथील नसींग कॉलेज व इतर विभागांना चांगल्या इमारतीची गरज आहे . हे लक्षात घेता आजच्या घडिला जिल्हा रुग्णाल परिसरात उपलब्ध असलेल्या जागेवर लवकरच अद्ययावत वैद्यकिय सुविधांचे एकत्रित संकुल लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले . याठिकाणी सी . टी . स्कॅन विभागाचीही अत्यंत गरज होती . ती गरज लक्षात घेऊन या 200 खाटाच्या ओपीडीसह हा सी . टी . स्कॅन विभागही जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करेल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . . नवीन उभारण्यात आलेल्या या इमारतीची स्वच्छता व येथील उपकरणांची निगा ही तितक्याच गुणवत्तापूर्ण पद्धतीने घेतली पाहिजे . शासन जनतेच्या सुविधेसाठी चांगल्या वास्तू निर्माण करते मात्र कालांतराने त्याठिकाणी स्वच्छता व निगा याबाबत फारशी काळजी घेतल्या जात नाही , अशी खंत त्यांनी व्यक्त करुन या नवीन वास्तुच्या स्वच्छतेबद्दल योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले . कोरोना आपत्तीमुळे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करुन त्यांना जनतेच्या सेवेत तत्पर ठेवणे हे अतिशय महत्वाचे झाले आहे . यासाठी येत्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरण कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी 41.54 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 5 कोटी 28 लक्ष 66 हजार रुपये एवढा निधी किनवट आणि माहूर तालुक्यातील आदिवासी भागात आरोग्य सेवा बळकटी करणासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . या नवीन 200 खाटांच्या रुग्णालयात प्राथमिक तपासणी , पॅथॉलॉजी विभाग , क्ष किरण विभाग , ओपीडी , इंजेक्शन आणि ड्रेसिंग , डायलेसीस , औषध भांडार , महानगर ब्लड बँक , फिजिओथेरपी , प्रतिक्षागृह आदि अद्ययावत वैद्यकिय सुविधा अंतर्भूत केल्या आहेत . सद्यस्थितीत कोरोनाचे आव्हान लक्षात घेता ही नवीन 200 खाटांचे इस्पितळ कोविडसाठी उपयोगात आणले जाणार आहे .
07 July 2020
Home »
» दोनशे खाटांचे नवीन हॉस्पिटल व सी.टी स्कॅन विभागाचे ना . अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण







0 comments:
Post a Comment