नांदेड दि . 10 : - कोरोनाचे जिल्ह्यातील आव्हान वाढत असून आज प्राप्त झालेल्या एकुण 188 अहवालांपैकी 132 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले तर नवीन 34 पॉझिटिव्ह व्यक्ती आढळले . त्यामुळे जिल्ह्यातील बाधित व्यक्तींची एकुण संख्या 558 एवढी झाली आहे . कोरोना आजारातून आज 5 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित व्यक्ती , डॉ . शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 2 बाधित , मुखेड कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित तसेच औरंगाबाद येथे संदर्भित झालेला 1 बाधित व्यक्तींचा समावेश आहे . आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 358 व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत आज शुक्रवार 10 जुलै रोजी कंधार इमामवाडी येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे . या रुग्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते . या बाधितास उच्च रक्तदाब , श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते . त्यामुळे आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत रुग्णांची संख्या 25 एवढी झाली आहे . नवीन बाधितांमध्ये नांदेड वाघाळा 41 वर्षाचा 1 पुरुष , गोकुळनगर येथील 47 वर्षाचा 1 पुरुष , नांदेड मोमिनपुरा येथील 55 वर्षाची 1 महिला , नांदेड हबिबियानगर येथील 70 वर्षाचा 1 पुरुष , दशमेश नगर बाफना येथील 57 वर्षाची 1 महिला , देगलूरनाका येथील 48 वर्षाचा 1 पुरुष , गणेशनगर नांदेड येथील 14 वर्षाची 1 महिला , विजयनगर येथील 68 वर्षाची 1 महिला , वजिराबाद येथील 54 वर्षाचा पुरुष , रविनगर येथील 45 वर्षाचा 1 पुरुष , धुमाळवाडी येथील 45 वर्षाची 1 महिला , 25 वर्षाचा 1 पुरुष , बिलोली गांधीनगर येथील 16 वर्षाचा 1 मुलगा , बिलोली तालुक्यातील फारुकी येथील 28 वर्षाचा 1 पुरुष , मुखेड तालुक्यातील तबलीन गल्ली येथील 11 बाधितांमध्ये 3 वर्षाचा बालक , 16,45,43,27 वर्षाचे 4 पुरुष , 9,13 वर्षाच्या 2 मुली , व 35 , 43 , 28 , 30 वर्षाच्या 4 महिला , मुखेड व्यंकटेशनगर येथील 45 वर्षाचा 1 पुरुष , 38 वर्षाची 1 महिला , मुखेड वाल्मिकनगर येथील 22 वर्षाचा 1 पुरुष , मुखेड मदनलपूर येथील 50 वर्षाची 1 महिला , 56 वर्षाचा 1 पुरुष , कंधार इमाम वाडी येथील 52 वर्षाचा 1 पुरुष , नायगाव बळवंतनगर येथील 12 वर्षाचा 1 बालक , लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील 33 वर्षाचा 1 पुरुष , परभणी आनंदनगर येथील 34 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे . ( नमृद वरीलपैकी 18 बाधित व्यक्तींचा अहवाल गुरुवार 9 जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे . तसेच उर्वरित 16 बाधित व्यक्तींचा अहवाल शुक्रवार 10 जुलै रोजी दुपारी प्राप्त झाला आहे . ) आज 175 पॉझिटिव्ह बाधित व्यक्तींवर औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची त्यात 10 महिला आणि 8 पुरुष बाधित व्यक्तींची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे . नांदेड जिल्ह्यात एकुण 558 बाधितांपैकी 25 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर 358 बाधित व्यक्ती बरे झाले आहेत . उर्वरीत 175 बाधित व्यक्तींमध्ये डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 50 , पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 58 , मुखेड कोविड केअर सेंटर येथे 28 , नायगाव कोविड केअर सेंटर येथे 7 , जिल्हा रुग्णालय येथे 5. बिलोली कोविड केअर सेंटर येथे 11. हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2 . देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1 , किनवट कोविड केअर सेंटर येथे 2 , हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 4 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत . शुक्रवार 10 जुलै रोजी 266 व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल .
10 July 2020
Home »
» कोरोनातून 5 व्यक्ती झाले बरे 34 व्यक्ती बाधित तर एकाचा मृत्यू







0 comments:
Post a Comment