जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

11 July 2020

नायगाव येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

नायगाव (बा): नायगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असून शुक्रवारी आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण संख्या १० झाली आहे . शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून पहिला बाधित रुग्ण ६ जुलै रोजी जुन्या गावातील बोमनाळे गल्लीत निघाला . यांच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना क्चारंटाईन करून ७ जुलै रोजी त्यांचा स्वब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला होता . यातील ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला . यातील ७ जण बोमनाळे गल्लीतील तर १ बळवंतनगर मधील होते . बळवंतनगरमधील बाधित रुग्णाच्या संपर्कातील १४ जणांना क्वारंटाईन करून ९ जुलै रोजी ११ जणांचा स्वब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते . त्याचा अहवाल १० जुलै रोजी आला असून त्यात ९ जण निगेटिव्ह तर एक जण पॉझिटिव्ह , राखीवमध्ये एक जण असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक एच . आर . गुंटूरकर , डॉ . सचिन वाघमारे , डॉ.देवणीकर यांनी दिली . बळवंतनगर मधील पॉझिटिव्ह निघालेला तरुण हा अगोदरच्या बाधित रुग्णाच्या अतिजवळच्या नात्यातील आहे . कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी म्हणून शहरात तीन दिवसीय जनता क ! स सुरुवात झाली . शुक्रवारी पहिल्या दिवशी शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद होती .

0 comments:

Post a Comment