जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

03 July 2020

कोरोनातून 8 व्यक्ती झाले बरे आज नवीन 16 व्यक्ती बाधित एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

नांदेड दि . 3 : - कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 7 बाधित आणि डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 बाधित असे एकूण 8 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 306 व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत . नांदेड चौफाळा येथील 52 वर्षाच्या महिलेचा गुरुवार 2 जुलै रोजी सायंकाळी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला . या बाधित महिलेला उच्च रक्तदाब , श्वासनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते . त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरानामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 18 एवढी झाली आहे . शुक्रवार 3 जुलै रोजी प्राप्त झालेल्या एकुण 106 अहवालापैकी 71 अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले तर 16 नवीन बाधित व्यक्ती आढळले . जिल्ह्यात एकूण बाधित व्यक्तीची संख्या 414 एवढी झाली आहे . नवीन बाधितांमध्ये गवळीपुरा येथील 20 वर्षाची 1 महिला , नवीन कौठा येथील 42 वर्षाचा 1 पुरुष , विष्णुपुरी येथील 31 वर्षाचा 1 पुरुष , देगलूर नाका रहेमतनगर येथील 50 वर्षाचा 1 पुरुष , चक्रधरनगर येथील 65 वर्षाची 1 महिला , विकासनगर येथील 35 वर्षाचा 1 पुरुष श्रीनगर येथील 38 वर्षाची 1 महिला व 10 व 17 वर्षाचे 2 पुरुष आंबेडकर नगर येथील 35 व 38 वर्षाचे 2 पुरुष , बळीरामपूर येथील 21 वर्षाचा 1 पुरुष , कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील 27 वर्षाचा 1 पुरुष , कंधार येथील 23 व 45 वर्षाच्या 2 महिला आणि 17 वर्षाचा एका पुरुषांचा यात समावेश आहे . सद्यस्थितीत या सर्व बाधित व्यक्तींवर उपचार सुरु आहेत . आतापर्यंत 414 बाधितांपैकी 306 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . उर्वरीत 90 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत . यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे . यात 4 महिला व 6 पुरुष बाधिताचा समावेश आहे . नांदेड जिल्ह्यात 90 बाधित व्यक्तींमध्ये डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 29 बाधित , पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 46 बाधित तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1 , देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1 , हदगाव कोविड केअर सेंटर येथे बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित उपचार घेत आहे . तर बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत . शुक्रवार 3 जुलै रोजी 93 व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल . 

0 comments:

Post a Comment