जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

02 July 2020

कोरोनातून 6 व्यक्ती झाले बरे ; आज नवीन 7 व्यक्ती बाधित

नांदेड दि . 2 : - कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 3 बाधित डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 बाधित आणि औरंगाबाद येथे संदर्भित झालेले 2 बाधित असे एकूण 6 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 298 व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत . गुरुवार 2 जुलै रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 79 अहवालापैकी 58 अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत . आज 7 नवीन बाधित आढळल्याने जिल्ह्यात एकूण बाधित व्यक्तीची संख्या 398 एवढी झाली आहे . नवीन बाधितांमध्ये निजाम कॉलनी येथील 60 वर्षाची 1 महिला , खुदबेनगर येथील 40 वर्षाची 1 महिला , जुना मोंढा येथील 36 वर्षाचा 1 पुरुष , हैदरबाग येथील 53 वर्षाचा 1 पुरुष , म्हाडा कॉलनी येथील 35 वर्षाचा 1 पुरुष , आंबेडकरनगर येथील 80 वर्षाचा 1 पुरुष तसेच मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील 30 वर्षाचा 1 पुरुष बाधित यांचा समावेश आहे . या सर्व बाधित व्यक्तींवर उपचार सुरु आहेत . आतापर्यंत 398 बाधितांपैकी 298 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . उर्वरीत 83 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत . यातील 13 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे . यात 7 महिला व 6 पुरुष बाधिताचा समावेश आहे . नांदेड जिल्ह्यात 83 बाधित व्यक्तींमध्ये डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 29 , पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 40 तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1 , देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1. हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 1 बाधित उपचार घेत आहे . तर 9 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत . गुरुवार 2 जुलै रोजी 90 व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल . जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे . सर्वेक्षण -1 लाख 46 हजार 935 , घेतलेले स्वब -6 हजार 607 , निगेटिव्ह स्वब- 5 हजार 710 , आज पॉझिटिव्ह स्वब संख्या -07 , एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती -398 , आज स्वब तपासणी अनिर्णीत संख्या -14 , आज स्वब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक , मृत्यू संख्या -17 , रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 298 , रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती -83 , स्वब तपासणी चालू व्यक्तींची 90 एवढी संख्या आहे . कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये . आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतृ अॅप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे अॅप सतर्क करेल , असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर यांनी केले आहे .

0 comments:

Post a Comment