जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

02 July 2020

वीज पडून तरुणाचा मृत्यू;…गावावर शोककळा

किनवट:-शहरापासून पूर्वेस पाच कि.मी.अंतरावरील मांडवा येथील एका आदिवासी तरुण शेतकर्‍यावर अचानक वीज कोसळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे.ही घटना गुरूवारी दि.02 दुपारी 2 सुमारास घडली.

मांडवा गावचा रहिवासी असलेला सुरेश जंगू कनाके (वय 22 वर्षे) हा आदिवासी तरुण आपल्या शेतात काम करीत होता. गुरूवारी दुपारी पाऊस सुरू झाला सुरूवात झाली. पावसापासून बचावासाठी त्याने शेतातील एक कडूलिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला होता. यात सुरेश कनाके याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कळताच आ.भीमराव केराम, तहसीलदार उत्तम कागणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पश्चात आई,वडील व तीन बहिणी असा परिवार आहे.

0 comments:

Post a Comment