बिलोली:गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अनेक | पिके उन्हामुळे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच बुधवारी दुपारी २ वाजता च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली . त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे . मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली . त्यामुळे जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या . नंतरच्या काळात मात्र पावसाने उघडीप दिली . ठिकठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला तर काही ठिकाणी पाऊसच झाला नव्हता . कडक उन्हामुळे सोयाबीन , कापूस , तूर , मूग , उडीद आदी पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात होती . त्यामुळे पिकांना जीवदान मिळण्यासाठी पावसाची अत्यंत आवश्यकता होती . बुधवारी दुपारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जवळपास अर्धा एक तास हजेरी लावली . त्यामुळे या भागातील पिकांना जीवदान मिळाले आहे . आजच्या पावसाने सखल भागात पाणी साचले असून रस्त्यावरूनही पाणी वाहत होते .दरम्यान , नांदेड शहर व परिसरातही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा होत असे .बुधवारी दुपारी सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला आणि अर्धा एक तास पावसाने जोरदार हजेरी लावली . त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला .







0 comments:
Post a Comment