जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

08 July 2020

कोरोना पाचशेच्या जवळपासः एक महिलेचा मृत्यू

नांदेड, -कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेत दिवसेंदिवस भर घालणारी ठरत आहे. बुधवारी सकाळी काही स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये नव्याने नऊ वाढले आहेत. तर एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 493 इतकी झाली आहे.प्रयोग शाळेकडून बुधवार दि. 8 जुलै रोजी 106 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये 87 अहवाल निगेटीव्ह, 8 अनिर्णीत, 2 अहवाल नाकारण्यात आले, तर 9 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. कोरोना पॉझिटीव्ह आलेले सर्वच्या सर्व रुग्ण हे पुरुष आहे. विशेष बहुतांशी रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 493 झाली आहे. तर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 335 आहे.
65 वर्षीय महिलेचा मृत्यू

कंधार तालुक्यातील उमरज जवळील सोनमंतलतांडा येथे एका 65 वर्षी महिलेचा कोरोनाचा अहवाल दि. 30 जून रोजी पॉझिटीव्ह आला होता. या महिलेचा दि. 8 जुलै रोजी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 23 झाली आहे. तर मंगळवारी दोन रुग्ण मरण पावले होते.
——-
कोरोना तपशीलवार
पत्ता————–स्त्री/पुरुष———-वय
1)काटकळंबा(कंधार)–पुरुष————24

2)सिडको(नांदेड)—–पुरुष————36

3)सावित्रीबाई फु ले नगर(नांदेड)-पुरुष——38

4)मुखेड————-पुरुष———-34

5) देगलूर————पुरुष———-46

6)परभणी————पुरुष———–70

7)बिलोली———-पुरुष————32

8)गोकुंदा(किनवट)—-पुरुष————18

9)गोकुंदा(किनवट)—-पुरुष————20

0 comments:

Post a Comment