नांदेड दि . 11 : -जिल्ह्यात 8 ते 10 जुलै दरम्यान वाहतुकीमध्ये परवानगी पेक्षा जास्त व्यक्तींची वाहतूक करणाऱ्या 248 वाहनधारकांकडून 76 हजार 800 रुपयांचा दंड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तपासणी मोहिमेतील दोन पथकांमार्फत वसूल करण्यात आला आहे . कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात " मिशन ब्रेक द चेन " अंतर्गत आदेश निर्गमीत केले आहेत . या आदेशाची जिल्हाभर कडक व काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे . तसेच दोषींविरुद्ध तात्काळ कारवाई सुरु आहे . सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्कम परिधान न केल्यास व सामाजिक अंतराचे पालन न केल्यास दंड ठोठावला जात आहे . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे . जनतेने कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये , कुठल्याही प्रकारची शंका , भिती मनात न बाळगता सुरक्षिततेची काळजी घ्यावी , असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे .
11 July 2020
Home »
» जास्त व्यक्तींची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना 76 हजार 800 रुपयाचा दंड







0 comments:
Post a Comment