नांदेड दि . 11 : - कोरोनाचे जिल्ह्यातील 3 बाधित व्यक्ती आज बरे झाले असून नवीन 11 बाधित व्यक्तींची वाढ झाली आहे . आज भोकर तालुक्यातील तेलीगल्ली गांधी चौक येथील 33 वर्षाची 1 बाधित महिला व नांदेड तालुक्यातील बळीरामपूर येथील 28 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु असतांना मृत्यू झाला . या बाधितास उच्च रक्तदाब , श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते . शनिवार 11 जुलै रोजी प्राप्त झालेल्या एकुण 104 अहवालापैकी 79 निगेटिव्ह तर 11 व्यक्ती बाधित आढळल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या एकुण 569 एवढी झाली आहे . आतापर्यंत 361 व्यक्ती बरे झाले असल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . रुग्णालयात एकुण 181 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत . औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकुण 27 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे . शनिवार 11 जुलै रोजी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 1 , बिलोली कोविड केअर सेंटर येथील 2 बाधित असे एकुण 3 बाधित व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . नवीन बाधितांमध्ये वजिराबाद नांदेड येथील 64 वर्षाचा 1 पुरुष , वाल्मिकीनगर येथील 44 वर्षाचा 1 पुरुष , नांदेड बळीरामपूर दुधडेअरी येथील 28 वर्षाचा 1 पुरुष , नांदेड टायरबोल्ड येथील 32 वर्षाचा 1 पुरुष , भोकर येथील 33 वर्षाची 1 महिला , मुदखेड बाझार मोहल्ला येथील 40 वर्षाचा 1 पुरुष , मुदखेड नगरपालिका परिसर येथील 45 व 30 वर्षाच्या 2 महिला , बिलोली तालुक्यातील नागणी येथील 30 वर्षाचा 1 पुरुष , कुंडलवाडी येथील 26 वर्षाचा 1 पुरुष , देगलूर तालुक्यातील भायेगाव येथील 36 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे . या 11 बाधित व्यक्तींचा अहवाल शुक्रवार 10 जुलै रोजी उशिरा प्राप्त झाला आहे . आज 181 पॉझिटिव्ह बाधित व्यक्तींवर औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची त्यात 9 महिला आणि 7 पुरुष बाधित व्यक्तींची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे . औषधोपचार सुरु असलेल्या 181 बाधित व्यक्तींना डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 58 , पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 54. मुखेड कोविड केअर सेंटर येथे 25 , नायगाव कोविड केअर सेंटर येथे 7 , जिल्हा रुग्णालय येथे 7 , बिलोली कोविड केअर सेंटर येथे 8 , हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2.किनवट कोविड केअर सेंटर येथे हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 9 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 8 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत . शनिवार 11 जुलै रोजी 340 व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल .
11 July 2020
Home »
» कोरोनातून 3 व्यक्ती बरे तर 11 बाधित 33 वर्षाची महिला व 28 वर्षातील पुरुषाचा मृत्यू







0 comments:
Post a Comment