जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

17 July 2020

विद्यानिकेतनचा 12 वीचा निकाल 92.15 टक्के

बिलोली (ता.प्र):चेतना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हेबोरगाव  संचलीत विद्यानिकेतन मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालयाचा फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे इयत्ता बारावी कला शाखेतील 51 विद्यार्थीनी पैकी 47 विद्यार्थीनी उत्तीर्ण निकाल .92.15 टक्के लागला असून विद्यानिकेतन मुलींचे माध्यमिक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे . एच.एस.सी. बोर्डामार्फत घेण्यात आलेल्या 12 वी परिक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे . या परिक्षेत संस्थेचे अध्यक्ष श्री बाबाराव एंबडवार,सचिव श्री सुनील एंबडवार,मुख्याध्यापिका सौ.स्वाती एंबडवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेजने उज्चल यश मिळवले . कॉलेजची 12 वी कला शाखेतील विद्यार्थी गावंडे सुषमा सुभाष हिने 79.38 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक ,नरहरे संजना देविदास हिने 76.76 टक्के गुण मिळवून द्वितीय तर ,असमवाड आश्विनी सायलु हिने 75.69 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला . विद्यालयाने निकालाची उज्चल परंपरा कायम राखल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री बाबाराव एंबडवार ,सचिव श्री सुनिल एंबडवार , मुख्याध्यापिका सौ. स्वाती मॕडम एंबडवार तसेच प्रा. परसुरे सर प्रा. शेख सर व प्रा. सौ. विभुते मॕडम यांनी व संस्थेतील सर्व शिक्षकांनी सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन  करुन  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
                            प्रतिनिधी:शुभम निदाने

0 comments:

Post a Comment