नायगाव : नायगाव शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व वाढता प्रभाव कमी करण्यासाठी नगरपंचायत येथे सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली होती . व याला व्यापारी बांधवांनी पुर्ण पाठींबा देत तीन दिवस जनता कपर्यु करण्याचा ठराव नगरपंचायत कडे सुपूर्द केला त्यामुळे दि .१० जुलै पासून नायगांवमध्ये जनता कप ! करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला . शहरात आज दि .10 जुलै च्या सकाळपासूनच व्यापा - यांनी आपापली दुकाने बंद ठेवून जनता कर्म्युला उत्स्फूर्सपणे प्रतिसाद दिला . शहर कडकडीत बंद केले होते . तर पोलीस बांधवांनी आपले कर्तव्य बजावत शहरात पोलीस वाहनासह फिरत असल्याचे दिसत होते जनता कर्म्युला नायगावच्या नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिल्याने व पुढेही जनता साथ दिली तर निश्चितच करोनाची साखळी तोडून कोरोनाचा प्रभाव रोखता येऊ शकतो एवढे मात्र निश्चित दरम्यान शहरातील प्रत्येक नागरिकांवर ओढावलेल्या या संकटातुन बाहेर पडण्यासाठी योग्य खबरदारी व उपाय योजना करून त्याची अमलबजावणी होणेही महत्वाचे असल्यामुळे हा निर्णय शहरातील सर्व पक्षीयांनी घेतल्याने ही महत्वाची भूमिका असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे .
11 July 2020
Home »
» नायगावकरांचा जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद ; नायगाव कडकडीत बंद







0 comments:
Post a Comment