बिलोली:कोरोनामुळे मागच्या चौविसा तासाच्या आत तीन जणांचा बळी घेतला, असून बळींची संख्या 27 झाली आहे. औरंगाबादनंतर सर्वाधिक बळींची नोंद नांदेड जिल्ह्यात नोंदविली जात आहे. तर शनिवारी सकाळी काही नमुन्यांचा स्वॅबमध्ये अकरा जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 569 झाली आहे.शुक्रवारी आलेल्या अहवालात नव्याने सतरा रुग्णांंची भर पडली होती. तर कंधार तालुक्यातील इमामवाडी येथील 52 वर्षी इसमाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. या रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मृत्यू झाला.28 पुरुष तर 33 महिलेचा सुद्धा मृत्यू
कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात मरणारांची संख्या पन्नाशीच्या पुढे होती. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे तारुण्यात महिला व एक पुरुषाचा बळी जाण्याची बहुदा पहिलीच नोंद आहे. नांदेड तालुक्यातील बळीरामपुर येथे राहणार्या 28 वर्षीय तरुणाचा स्वॅब दि.9 जुलै रोजी पॉझिटीव्ह आला होता. या रुग्णावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी रात्री मृत्यू झाला. याचसोबत तेलीगल्ली येथील 33 वर्षीय महिलेचे स्वॅब दि. 3 जुलै रोजी पॉझिटीव्ह आले होत. या महिलेचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.
कुंडलवाडी येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व वाहन चालक यांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या दोन तरुणाचा अहवाल दिनांक 10 रोजी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरात एकच खलबळ उडाली आहे .... कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल 9 रोजी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचे स्वब घेण्यात आले होते.त्यातील दोन व्यक्तीचा पॉझिटिव्ह अहवाल दिनांक 10 रोजी रात्री उशीरा प्राप्त झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वाडेकर यांनी दिली आहे.पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती मध्ये एका सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व कुंडलवाडी येथे कृषि सेवा केंद्र चालवणाऱ्याचा समावेश आहे.कृषि सेवा केंद्र चालवणारा व्यक्ती हा गेल्या तीन दिवसापूर्वी नागरपालिके मध्ये व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत उपस्थित होता , त्यामुळे शहरातील शेतकऱ्यासह व्यापारी वर्गा मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरातील पॉझिटिव्ह आलेला परिसर प्रशासनाने सील करुण या दोन कोरोना बाधित व्यक्तीना बिलोली येथील कोव्हिड सेंटर येथे पाठवण्यात येणार आहे.
पॉझिटीव्ह रुग्णांची माहिती सविस्तरपणे
पत्ता————स्त्री/पुरुष————वय
1)नागणी(बिलोली)—पुरुष————30
2)कुंडलवाडी(बिलोली)-पुरुष————26
3)तेली गल्ली(भोकर)—स्त्री————33
4)मुखेड————-स्त्री————30
5)मुखेड————-स्त्री————45
6)बाजार मोहल्ला(मुदखेड)-पुरुष———-40
7)बाहेगाव(देगलूर)——पुरुष———-36
8)वजिराबाद(नांदेड)——पुरुष———-64
9)बळीरामपुर(नांदेड)—–पुरुष———-28
10) तिरेबोर(नांदेड)—–पुुुरुष———–32
11) वाल्मिकी नगर—–पुरुष———–44







0 comments:
Post a Comment