जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

11 July 2020

देगलुर येथील व्यावसायिक निघाला पॉझिटिव्ह

 देगलूर :कोरोना विषाणू ने  सर्वत्र थैमान घातले आहे.जिल्हात दिवसन दिवस पॉझिटिव्ह रूग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ चाललेली आहे.काही महिन्यांपूर्वी कोरोना मुक्त असलेला देगलुर तालुका आता तेथे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची संख्येत भर पडत आहे.तेलंगणातील पिटलम येथील डॉक्टरास कोरोना संक्रमणाची लक्षणे दिसत असल्याने ते डॉक्टर पत्नी व आपल्या पाच महिन्याच्या बाळाला घेऊन ते येथील नाथनगर मध्ये पली व बाळाला सोडून नांदेडला वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाले . रविवारी रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी त्यांच्या थेट संपर्कातील पत्नी , बाळ , व वाहनचालक यांचा स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता .त्यामध्ये डॉक्टर पत्नी व पाच महिन्याच्या बाळाचा अहवाल गुरूवारी कोरोना पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर देगलुर शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील ४८ वर्षीय व्यावसायिक कोरोनाबाधित झाला . शुक्रवारी सायंकाळी या व्यावसायिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह म्हणून प्राप्त झाला . या व्यावसायिकास त्रास होत असल्याने बुधवारी त्याने स्वतः उपजिल्हा रुग्णालयात जावून स्वॅब तपासणी करण्याची विनंती केली होती . मात्र , बुधवारी उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब कीट नसल्याने या व्यावसायिकाने थेट नांदेड गाठले . शुक्रवारी सायंकाळी या व्यावसायिकाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला .

0 comments:

Post a Comment