जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

04 July 2020

कोरोना बाधितांसोबत पत्ते पिसणाऱ्या २९ जनांच्या अहवालाच्या प्रतिक्षेत नागरीक

बिलोली - कर्नाटक राज्यातील औराद येथिल कोरोना पाॅझिटीव निघालेल्या दांपत्याच्या संपर्कात आलेल्या बिलोली शहरातील गांधीनगर येथे राहणाऱ्या आजी - नातु या दोघांचा अहवाल दि .3 जुलै रोजी रात्री उशिरा कोरोना पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्या कोरोना बाधितांसोबत पत्ते पिसणाऱ्याना आता धास्ती लागली असून काहींनी स्वतः हुन कोविड सेंटर मध्ये आपला स्वॅब दिला कांहीजन स्वतः हुन होम क्वारंटाईन झाले आहेत . यामध्ये शहरातील अनेक प्रतिष्ठित आहेत. यामध्ये २ ९ जणांना क्वारंटाईन केले असून त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आल्याची अधिकृत माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ . नागेश लखमावार यांनी दिली आहे .कोरोना बाधिताच्या कृषी दुकानातून ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात खत व औषधी घेण्यासाठी येतात त्यामुळे त्यांची सुध्दा चिंता वाढली आहे.शहराच्या गांधीनगर भागातील हे दोन रुग्ण आल्यानंतर त्यांनी राहत असलेला जवळपास ५० घरांचा एरिया न.प.तर्फे निर्जतुकीकरण करुन तो एरिया कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे . या भागातील नागरिकांना घराच्या बाहेर जाता येणार नाही व बाहेरुन आलेल्याना या भागात येता येणार नसुन संबंधित नागरिकांना अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुण देण्यासाठी न.प.च्या एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मुख्यधिकारी डॉ.प्रशांत व्हटकर यांनी दिली आहे . त्या बधिताच्या कृषी दुकानातून अनेकांनी खते व औषधी घेतल्याने ते सुद्धा चिंतेत आहेत .मात्र आता सर्वांचे लक्ष 29 अहवालाकडे लागलेे आहेे. 

0 comments:

Post a Comment