जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

12 July 2020

महिलांच्या अधिकारासाठी स्व.शंकरराव चव्हाण सदैव असायचे आग्रही - अमिताताई चव्हाण

जिल्हा पोलीस मुख्यालयातील “ भरोसा सेल " चा नवीन जागेत शुभारंभ  
नांदेड दि . 12। महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी स्व . डॉ . शंकरराव चव्हाण यांनी नेहमीच सकारात्मक भुमिका घेतली . तीच भुमिका घरीसुद्धा त्यांनी ठेवत मला विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले , असे सांगत सौ . अमिताताई अशोकराव चव्हाण यांनी स्व . शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला . नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने भारताचे माजी गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हैद्राबाद मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक स्व . डॉ . शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षाचे औचित्याने जिल्हा पोलीस विभागांतर्गत " भरोसा सेल " च्या नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचे प्रातिनिधिक उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या . यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ . मंगाराणी अंबुलगेकर , महापौर सौ . दिक्षाताई धबाले , सौ . राजश्रीताई हेमंत पाटील , सौ . जयश्री विजयकुमार मगर जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे , अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार , दत्तराम राठोड , पोलीस उपअधिक्षक अभिजित फसके धनंजय पाटील , डॉ . सिद्धेश्वर धुमाळ , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक डी जी चिखलीकर महिला पोलीस अधिकारी अनिता दिनकर आदींची उपस्थिती होती . महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषींना कठोर शिक्षा ही अभावानेच पाहायला मिळते . यातील ज्या काही पळवाटा असतील त्या " भरोसा सेल " च्या माध्यमातून थांबवुन सर्व तपास यंत्रणा बिनचुक कार्य करेल , असा विश्वास सौ . अमिताताई चव्हाण यांनी व्यक्त केला . महिलांनीही शक्यतोवर आपल्या संसारिक जीवनातील वाद हे घरच्याघरीच सामोपचाराने मिटविण्यास प्राधान्य दिले पाहिजे , असेही त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले . समाजातील पिडित महिलांना अनेक पातळ्यांवर अपमान सहन करावा लागतो . विशेषत : त्यांच्या सोबत जी लहान मुलं असतात त्यांनाही त्यांचा कुठलाही दोष नसतांना त्रास सहन करावा लागतो . हा त्रास व त्यांना येणाऱ्या अडचणी या “ भरोसा " विभागामार्फत दूर होतील , असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ . मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगितले . . महिलांवरील अत्याचाराच्या बहुसंख्य प्रकरणात न्याय मागतांनाही महिलांनाच अधिक प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते . कोणत्याही अन्यायग्रस्ताला आपल्या आन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कोणतेही पोलीस स्टेशन हे आपले वाटले पाहिजे , अशी अपेक्षा सौ . राजश्रीताई हेमंत पाटील यांनी व्यक्त केली . स्व . डॉ . शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस मुख्यालयात नव्या स्वरुपात उभारण्यात आलेला हा " भरोसा " विभाग सर्व महिलांच्या , अबाल वृद्धांच्या मनात विश्वास निर्माण करेल , या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या . जिल्ह्यातील अबाल वृद्धांसह महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी पोलीस विभागामार्फत वेळोवेळी समुपदेशनासह विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत . भारताचे माजी गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री स्व . डॉ . शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून समाजातील ज्येष्ठ नागरिक , लहान मुले व विशेषत : पिडित महिला यांना न्याय देण्यासाठी , सुरक्षा देण्यासाठी हा विभाग नव्या स्वरुपात तयार करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले . 

0 comments:

Post a Comment