नांदेड दि . 8 : - कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित व्यक्ती , श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथून 1 , व डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय येथील 2 , हदगाव कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित तसेच मुखेड कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित व्यक्ती असे एकुण 6 बाधित व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 341 व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत . 1 बुधवार 8 जुलै 2020 रोजी सायं 6 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 276 अहवालापैकी 198 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले . यात नवीन 53 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले . त्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या 511 एवढी झाली आहे . नवीन बाधितांमध्ये कंधार विकासनगर येथील 72 व 39 वय वर्षाचे 2 पुरुष , काटकळंब गावातील 24 वर्षे वयाचा 1 पुरुष बाधित झाला . मुखेड दत्तात्रयनगर येथील 52 वर्षाचा 1 पुरुष तसेच 35 व 38 वय वर्षे वयाच्या 2 महिला , मुखेड तग्लीन गल्ली येथील 34 वर्षे वयाचा 1 पुरुष , 21 वर्षाची महिला व 10 वर्षाची 1 मुलगी , मुखेड दापका येथील 10 वर्षे वयाचा 1 बालक , पोलीस कॉलनी मुखेड येथील 30 वर्षे वयाचा 1 पुरुष , शिवाजीनगर मुखेड येथील 17 वर्षे वयाचा 1 पुरुष , नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भागातील 36 वर्षे वयाची 1 महिला , कंधार तालुक्यातील मोहिजा परंडा येथील 23 वर्षे वयाची 1 महिला , हस्सापूर नांदेड येथील 47 वर्षाचा 1 पुरुष , 6 वर्षे वयाचा 1 बालक , 50 वर्षे वयाची 1 महिला , 2 वर्षे वयाची 1 मुलगी , उमर कॉलनी नांदेड येथील 34 व 61 वर्षाचे 2 पुरुष व 4 वर्षे वयाचा 1 बालक , बालाजीनगर तरोडा येथील 25 , 30 , 58 वर्षाचे 3 पुरुष , 5 वर्षाचे 2 बालक , 34 व 55 वर्षाचा 2 महिला . सिडको येथील 36 वर्षाचा 1 पुरुष , सावित्रीबाई फुलेनगर येथील 38 वर्षाचा 1 पुरष , पिरबुहानमधील 18 वर्षाची 1 महिला , देगलूरनाका नांदेड येथील 42 वर्षाची 1 महिला , हदगाव तालुक्यातील पळसा येथील 25 वर्षे वयाचा 1 पुरुष , देगलूर येथील फाजोदिन टॉकिज जवळील 46 वर्षाचा 1 पुरुष , परभणी जिल्ह्यातील वसा येथील 70 वर्षाचा 1 पुरुष , बिलोली गांधीनगर येथील 32 वर्षाचा 1 पुरुष , किनवट तालुक्यातील गोकुंदा 18 व 20 वर्षाचे 2 पुरुष , मुक्रमाबाद येथील 48 वर्षाचा 1 पुरुष , नायगाव येथील बोंबनाले गल्लीतील अनुक्रमे 40 , 60 , 31 वर्षाच्या 3 महिला , 7 व 2 वर्षाचा 2 मुली , 38 व 40 वर्षाचे 2 पुरुष व 6 वर्षाचा 1 बालक , यशवंतनगर येथील 52 वर्षाचा 1 पुरुष , अंबेडकरनगर येथील 28 वर्षाचा 1 पुरुष , देगलूरनाका येथील 60 वर्षाचा 1 पुरुष , विजयनगर येथील 75 वर्षाचा 1 पुरुष , गणेशनगर येथील 21 वर्षाचा 1 पुरुष व 47 वर्षाची महिला हे बाधित झाले आहेत . सर्व बाधितांवर उपचार सुरु आहेत . आज रोजी 147 पॉझिटिव्ह बाधित व्यक्तींवर औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधित व्यक्तींची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे . यात महिला व 7 पुरुषांचा समावेश आहे . 1 1 नांदेड जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 147 बाधित व्यक्तींमध्ये डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 45 , पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 60 , तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 8 , नायगाव कोविड केअर सेंटर येथे 2 बाधित , जिल्हा रुग्णालय येथे 4 बाधित बिलोली कोविड केअर सेंटर येथे 7 बाधित तर हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2 बाधित , मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तर किनवट कोविड केअर सेंटर येथे 2 , हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 3 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत . 8 जुलै 2020 रोजी 237 व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल .
08 July 2020
Home »
» नांदेड जिल्ह्यात आज 53 बाधितांची भर सहा व्यक्ती बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी







0 comments:
Post a Comment