बिलोली : तालुक्यात गत आठवड्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे . ९ जुलै रोजी ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले . त्यात पोलीस अधिकारी व पत्रकाराचा समावेश असल्याने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर यांनी नगरपरिषद व आयटीआय येथील कोविड सेंटरला आकस्मिक भेट दिली . कोविड सेंटरमधील भौतिक सुविधा व रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत . लॉकडाऊनच्या सुरुवातीला बिलोली शहरातील नगरपरिषदेच्या वरच्या माळ्यात कोरोना केअर सेंटर अर्थात फिव्हर क्लिनिक तयार करण्यात आले असून यात कोविड रुग्णांवर उपचार केले जात होते . परंतु शहरवासियांच्या तक्रारी व वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नगरपरिषद येथे संशयित रुग्ण तर शहरापासून अवघ्या एक कि.मी. अंतरावर असलेल्या आयटीआय येथे कोरोनाबाधितांची व्यवस्था करण्यात आली आहे . जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिलेल्या भेटीदरम्यान फिव्हर क्लिनिकमध्ये येणाऱ्या नागरिकांना ताप , सर्दी , खोकला किंवा इतर प्रकारच्या आजारांची लक्षणे असल्यास त्यांच्यावर उपचार व देखरेखीबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागेश लखमावार व सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे . नगरपरिषदेतील कोविड सेंटर येथे बिलोलीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील संशयितांना व आयटीआय येथील बाधित रुग्णांपैकी पत्रकार व पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी देवून आरोग्यविषयक माहिती घेतली असून कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या नागरिकांची विशेष निगराणी व देखरेख करण्याचे निर्देश दिले आहेत . यावेळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर , जिल्हा आरोग्य अधिकारी शिंदे , उपविभागीय अधिकारी शरद झाडके , नायब तहसीलदार डॉ . ओमप्रकाश गोंड , रघुनाथसिंग चौव्हाण , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . गणपत वाडेकर , डॉ.सतीश तोटावार , डॉ.कैलास शेळके , पोलीस निरीक्षक शिवाजीअण्णा डोईफोडे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती .
12 July 2020
Home »
» बिलोलीच्या कोवीड सेंटरला जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांची भेट







0 comments:
Post a Comment