जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

17 March 2020

सौदी अरेबियातून आलेल्या युवका मुळे देगलूर तालुक्यात कोरोनाची धास्ती संशयित रूग्णाची रिपोर्ट निगेटीव्ह

देगलूर दि . 17 मार्च , तालुका प्रतिनिधी तालुक्यातील तडखेल येथील एक 22 वर्षीय युवक सौदी अरेबियातून नुकताच स्वगृही परतल्याने कोरोना च्या संशयाने गावक र्यांसह प्रशासनाची पाचावर धारण बसली होती . मात्र त्या युवकाची रविवार दि 15 मार्च रोजी सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक तपासणी केल्यानंतर कोरोना चे कोणतेही लक्षणे आढळून न आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला . तडखेल येथील एक युवक मागील दोन वर्षांपासून सौदी अरेबियात कामास होता . कोरोना व्हायरसच्या भितीमुळे तो सौदी अरेबियातून 3 मार्च रोजी ( मंगळवारी ) हैदराबाद येथे येवून तो तडखेल येथे आला . सध्या जगभरात असलेली कोरोना व्हायरसची भिती तडखेलच्या ग्रामस्थात ही होती . या युवकास अनेकवेळा खोकलताना काही ग्रामस्थांनी पाहिले . असेच दहा दिवस उलटून गेले . मात्र एका जागरूक नागरिकांनी ही बाब शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली . शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांनी तहसीलदार अरविंद बोळंगे , वैदयकिय अधिक्षक संभाजी पाटील , पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर त्या युवकास रुग्णवाहिकेतून आणण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागले . परंतु डॉक्टरांचे पथक गावात गेले तर ग्रामस्थात भितीचे वातावरण होईल असा साक्षात्कार अधिकाऱ्यांना झाल्यामुळे त्यांनी त्या युवकाशी फोनवरून संपर्क साधून ॲटोत देगलूर येथे येण्याच्या सुचना दिल्या . देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात तो युवक आल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी व चौकशी करण्यात आली . त्या युवकास कोरोना व्हायरसची कोणतीच प्राथमिक लक्षणे नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ आकाश देशमुख यांनी सांगितले . मात्र तरीही खबरदारी म्हणून दोन दिवस त्या युवकास उपजिल्हा रुग्णालयात थांबण्यास सांगण्यात आले होते . मात्र आपल्याला काहीच त्रास नाही असे सांगत तो युवक आपल्या गावी गेला . आरोग्य विभागाचे कर्मचारी दोन तीन दिवस तडखेल येथे जावून त्याची तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले .अफवेवर विश्वास ठेवू नका सौदी अरेबियातून आलेल्या युवकास कोरोना व्हायरसची कोणतीच लक्षणे नसल्याचे दिसून आले आहेत . फक्त तो बाहेर देशातून आल्यामुळे त्याची प्राथमिक तपासणी केली . त्यास खोकला , ताप व घशाला कोरड येणे आदि कोणतीच लक्षणे आली नाहीत . त्या युवकास दुरुन पहाण्यासाठी नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती . दोन तास त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले होते . त्यास रुग्णवाहिकेतून त्याच्या गावी सोडण्यात आले . गावातील नागरिकांनाही त्याच्याकडे संशयित रुग्ण म्हणून पाहू नये असे सांगण्यात आले . कोरोना व्हायरसची लक्षणे आठ दिवसातच दिसून येतात . मात्र त्यास सौदी अरेबियातून येवून बारा ते तेरा दिवस उलटले . त्यामुळे तो पुर्णपणे तंदुरुस्त आहे . खबरदारी म्हणून आरोग्य विभागाचे कर्मचारी तीन दिवस तडखेल येथे जावून त्याची तपासणी करणार आहेत . कोणत्याही ही गावी बाहेरच्या देशातून कोणता नागरिक आल्यास तसे आम्हाला कळवावे त्यासाठी आरोग्य विभाग तत्पर आहे . तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकिय अधिक्षक संभाजी पाटील यांनी केले आहे .

0 comments:

Post a Comment