लातूर येथील सरकारी दवाखान्यात एक मुलगा जन्मला असून तो जन्मल्यावर ' लागलीच बोलू लागला . ' आज रात्री जो झोपेल तो सकाळी उठणारच नाही , तो मरेल . जो रात्रभर जागा राहील तोच वाचेल , " अशी अफवा रात्रभर वणव्यासारखी फसरली . पुणे , मुंबई , नांदेड येथुन येथील नागरिकांना असे फोन आल्याने नागरिकांनी रात्री घराबाहेर पडत रात्र जागून काढली. कोरोनाच्या भीतीने नागरिकांची आधीच झोप उडाली आहे . संचारबंदी मुळे कोणालाही घरा बाहेर फिरता येत नाही . त्यात अशा अफवामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण रात्री पसरले होते . नागरिकांनी अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका . आज पंतप्रधान व मुख्यमंत्री जे सांगत आहेत त्या गोष्टीवर विश्वास ठेवून घरी बसा . बाळ जन्मल्यावर लगेच बोलेल या फक्त अफवा आहेत . सोशल मीडियावर ही कोणतीही पोस्ट टाकण्याअगोदर त्याची शहानिशा करा . नागरिकांत भीती निर्माण होईल , अशा गोष्टी सोशल मिडीयावर टाकू नका .जो तो आपआपल्या नातेवाईकांना संपर्क साधून यासंदर्भात सांगून जागे राहण्यास सांगत होता . या गोष्टी वर विश्वास ठेवून येथील लोकांनी रात्रभर जागरण केले ,. कोणता नातेवाईक चुकू नये , म्हणून यादी करून फोनवर सांगितले , बिलोली तालुक्यातील अनेक गावे सुध्दा रात्र जागून काढली .
26 March 2020
Home »
» रात्री व्हॉटसअॅप वर फोटो वायरल जागले ते वाचले झोपले ते कायमचे झोपले







0 comments:
Post a Comment