कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता करण्यात आली असून, या ठिकाणी ५५ हजार ७०७ खाटांची सोय करण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानंतर खात्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी मेहनतीने ही तयारी केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.करोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. राज्यावरील संकटाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने पुरती तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतींमधील २२ हजार ११८ खोल्या प्रशासनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विश्रामगृहे, वस्तीगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती आदींचा समावेश आहे. या ठिकाणी वीज, पाणी अशा सुविधा देखील उपलब्ध असतील.या खोल्यांचा वापर विलगीकरण तसेच तात्पुरत्या स्वरूपातील रूग्णालय म्हणून केला जाऊ शकतो. आपात्कालीन यंत्रणेने यातील अनेक इमारतींचा वापर देखील सुरू केला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार हे कर्मचारी कोणत्याही क्षणी उपलब्ध असतील, अशीही माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
25 March 2020
Home »
» अशोक चव्हाण यांनी ५५ हजार खाटांची व्यवस्था केली आहे







0 comments:
Post a Comment