बिलोली दि . 19 मार्च,राज्यासह देशात कोरोणा विषाणूचे रूग्ण आढळून आल्यानंतर शासनाच्या वतीने या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाय योजना आखण्यात येत आहेत . याचाच एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाच्या आदेशानुसार बिलोली ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने सिमावर्ती भागात असलेल्या बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे . सदर तपासणी येत्या 31 मार्च पर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ . नागेश लखमावार यांनी दिली असून नागरिकांनी कोरोना बाबत भिती न बाळगता सुरक्षित रहाण्याचे अवाहन करण्यात आले आहे . बिलोली हा तालुका तेलंगणा राज्याच्या सिमेवर वसलेला आहे . या तालुक्यातील बरेचसे नागरिक कामानिमित्त लगतच्या तेलंगणा राज्यासह महाराष्ट्रातील मुंबई , पुणे , औरंगाबाद अशा मोठ्या शहरात गेलेले आहेत . राज्यासह देशात कोरोना विषाणूचे रूग्ण आढळून आले असून त्यातच महाराष्ट्रात पाँझीटीव्ह रूग्णांची संख्या जास्त असल्याने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक उपाय योजना आखण्यात आल्या आहेत . नागरिकांच्या गर्दीमुळे या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने शासनाच्या वतीने गर्दी न होण्यासाठी अनेक निर्णय घेतले असून बसस्थानकांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांची बसस्थानकातच तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते . नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ . विपिन ईटनकर यांच्या आदेशानुसार बिलोली ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने शहरातील बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत असून हैद्राबाद , मुंबई , पुणे इत्यादी मोठ्या शहरातुन येणाऱ्या प्रवाशांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे . दि . 19 मार्च पासून ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने बसस्थानकात वैद्यकीय अधिक्षक डॉ . नागेश लखमावार यांच्या नेतृत्वाखाली तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून यात डॉ . तोटावार , डॉ . शेळके , डॉ . सौ नांदेडे , डॉ . कल्याणकर ( गव्हाणे ) डॉ . इरशाद , सोहेल रब्बानी , सौ . ठाकूर , सौ . पाटील , बसवंत बाचेवार यांच्यासह रूग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला . बस स्थानकात झालेल्या तपासणी मोहिमेत मुंबई , पुणे सह अन्य बाधीत शहरातुन आलेल्या 17 रूग्णांना बाहेर न फिरता पुढील 14 दिवस घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येऊन त्यांच्या हातावर होम काँरनटाईन चा शिक्का मारण्यात आला . सदर मोहीम 31 मार्च पर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी कोरोना विषाणूची भिती न बाळता सतर्क राहण्याचे अवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ . नागेश लखमावार यांनी केले आहे
19 March 2020
Home »
» बिलोली - करोना प्रतिबंध अभियान : ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने बसस्थानकात प्रवाशांची तपासणी







0 comments:
Post a Comment