नांदेड | कोचिंग क्लासेस , शाळा , महाविद्यालय , व्यायामशाळा , मंगल कार्यालये , सिनेमागृहे , नाट्यगृहे पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटणकर यांनी दिले .येथील जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोंचिग क्लासेस , व्यायाम शाळा , मंगल कार्यालय चालक / मालक यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते . या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . सचिन खळ , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर , बा . क . जि . प . उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस . व्ही . शिंगणे , जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी श्रीमती आर . पी . काळम , उपशिक्षणाधिकारी ( मा ) माधव सलगर , कोंचिग क्लासेस , व्यायामशाळा , मंगल कार्यालय चालक / मालक यांच्यासह विविध अधिकारी ,प्रतिनिधी उपस्थित होते . महाराष्ट्र शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13 मार्च , 2020 पासून लागू केला असून सदरील कायद्याची दिनांक 14 मार्च , 2020 पासून महाराष्ट्र कोव्हीड - 19 उपाययोजना नियम 2020 लागू केलेली आहे . त्यानुसार महानगरपालिका , सर्व नगरपालिका , सर्व नगर पंचायत क्षेत्रातील , सर्व सरकारी व खाजगी अंगणवाड्या , सर्व सरकारी व खाजगी शाळा , तसेच महाविद्यालय , आयुक्त व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे याच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्था दिनांक 31 मार्च , 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत सांगितले .करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याकरिता नांदेड जिल्ह्यात सामाजिक , सांस्कृतिक राजकीय धार्मिक क्रिडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आलेला असून यापुर्वी वरील कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असल्यास सदर परवानगी रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले . नांदेड जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना ( अत्यावश्यक किराणा समान , दुध , भाजीपाला , औषधी दुकाने व अन्य जीवनावश्यक वस्तू वगळून ) दिनांक 31 मार्च , 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी सांगितले . कोणत्याही व्यक्तीस , संस्था , संघटनांना करोना संसर्गाबाबत अफवा अनाधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असून याचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुध्द कायदेशिर व दंडनिय कारवाई करण्यात येईल , अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटणकर यांनी यावेळी दिल्या .मागील 14 दिवसांत ज्या व्यक्तींनी करोनाबाधित देशातून प्रवास केलेला आहे , त्यांनी स्वत : याबाबतची माहिती करोना नियंत्रणासाठी राज्य नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 020 - 26127394 , एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष 020 - 27290066 व टोल फ्री क्रमांक 104 किंवा जिल्हा रुग्णालय नांदेड येथील नियंत्रण कक्ष 02462 - 249279 संपर्क साधावा . करोना संसर्गाची लक्षणे दिसून आल्यास संशयित रुग्णांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती होणे आवश्यक आहे . त्यास मज्जाव , प्रतिबंध , अडथळा आणण्याविरुध्द दंडनिय कार्यवाही करण्यात येईल .
16 March 2020
Home »
» करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोचिंग क्लासेस , शाळा , महाविद्यालय , व्यायामशाळा पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावे:डॉ. विपीन इटणकर







0 comments:
Post a Comment