जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

20 March 2020

बिलोली : लाच प्रकरणातील उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले पोलीसांना शरण ; एक दिवसाची पोलीस कोठडी

बिलोली दि . 20 मार्च ,तालुक्यातील मांजरा नदी पात्रातुन अवैध्यरित्या रेतीची वाहतूक करताना पकडलेले हायवा ट्रक सोडून देण्यासाठी दोन लाखाच्या लाच प्रकरणी गेल्या 7 ते 8 महिन्यापासून फरार असलेले बिलोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांची दि . 20 मार्च रोजी एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली . तालुक्यातुन वाहणाऱ्या मांजरा नदी पाजातुन अवैध्यरित्या रेतीची वाहतूक करित असताना पकडलेल्या दोन वाहनांवर शासनाचा दंड आकारण्यात आला होता . नियमानुसार आकारण्यात आलेला दंड भरूनही ट्रक सोडण्यासाठी बिलोलीचे तत्कालीन उप विभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांनी शामकुमार बोनिंगा यांच्या मार्फत 2 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती . यात श्रीनिवास जिंकला याने भोसले व ट्रक मालकांत मध्यस्ती करून लाच घेण्यास व देण्यास सहकार्य केले होते . या लाच प्रकरणी तक्रार मिळताच लाच लुचपत विभागाच्या वतीने गत वर्षी आँगस्ट महिन्यात बिलोली बस स्थानक परिसरात सापळा रचून खाजगी इसम बोनिंगा यास लाच स्विकारताना रंगेहात पकडून कारवाई केली होती . या कारवाईची माहिती मिळताच उप विभागीय अधिकारी भोसले हे फरार झाले होते . या काळात अटकपूर्व जामिनासाठी भोसले यांनी प्रयत्न केले होते मात्र त्यांना जामिन न मिळाल्याने भोसले यांनी 18 मार्च 2020 रोजी लाच लुचपत विभागात हजर होऊन आत्मसमर्पन केले होते . भोसलेंच्या शरनागतीनंतर त्यांना दि . 20 मार्च रोजी बिलोलीच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने भोसले यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे . या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहूल साहेबराव पखाले करत आहेत .

0 comments:

Post a Comment