जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

17 February 2023

पोलिसांचा संशयास्पद स्कॉर्पिओवर गोळीबार; ट्रक- जीप आडवी लावूनही मोटारसायकलला उडवत स्कॉर्पिओचा रात्रभर चालला थरार

बिलोली :संशयीत स्कार्पीओ पोलीसांच्या तावडीत सापडू नये यासाठी नरसी येथून सुसाट निघाली होती. मात्र ती थांबवण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी पाठलाग केला. बिलोली व कुंडलवाडी पोलिसांनी प्रयत्न केले मात्र चालकाने गाडी थांबवण्याचे नाव घेत नसल्याने नाईलाजास्तव पोलिसांनी गाडीच्या टायरवर गोळी झाडली. तरीही ती स्कार्पीओ नरसीच्या दिशेने निघाली शेवटी तळणी येथे संशयास्पद मुंबई पासींगची स्कार्पीओ व एक आरोपी ताब्यात घेण्यात आला.रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे हे गुरुवारी रात्री पेट्रोलींग करत असतांना बिलोली रोडवरील नरसी येथील शासकीय विश्रामगृहासमोर एम एच ०४ पासींगची स्कार्पीओ गाडी उभी असल्याचे दिसले. त्यांनी गाडी बाजूला घेण्यासाठी सांगितले. सदरच्या वाहण चालकाने गाडी बाजूला घेण्याचे सोडून बिलोलीच्या दिशेने सुसाट वेगात पळ काढला. गाडी बाजूला घेण्याऐवजी पळ काढल्याने संशय आला त्यामुळे दिघे यांनीही स्कार्पीओचा पाठलाग केला पण सापडत नसल्याने याची माहिती बिलोली पोलीसांना दिली.बिलोली पोलिसांनी बिलोली येथे स्कार्पीओ अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही गुंगारा देवून कुंडलवाडीच्या दिशेने पळ काढला होता. कुंडलवाडी पोलिसांनी संशयित स्कार्पीओ थांबवण्यासाठी चक्क रोडवर ट्रक आडवा लावला होता. तरीही सुसाट स्कार्पीओ चालकाने तेवढ्याच वेगात पुन्हा मागे वळवून बिलोलीच्या दिशेने निघाला. कुंडलवाडी बिलोली रोडवर बिलोली पोलिसांनी ११२ क्रमाकांची मोटरसायकल आडवीलावून थांबवण्याचा प्रयत्न केला पण आडव्या लावलेल्या मोटारसायकला उठवून स्कार्पीओ परत नरसीच्या दिशेने निघाली.यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी स्कार्पीओ थांबवण्यासाठी टायरवर डोळी झाडली पण ती टायरला लागली नाही. त्यामुळे स्कार्पीओ नरसीकडे धूम ठोकली. सुसाट स्कार्पीओ नरसीकडे येत असल्याने रामतीर्थ पोलिसांनी नरसी चौकात नाकाबंदी केली मात्र सदरची स्कार्पीओ नरसीकडे न येता बिलोली नरसी रोडवर असलेल्या तळणी गावात घुसवली परंतु स्कार्पीओ चालकाचा अंदाज चुकल्याने स्कार्पीओ एका खड्ड्यात अडकली.मागावर असलेल्या रामतीर्थ पोलिसांनी तातडीने तळणी येथे गेले यावेळी एका आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले असून अन्य काहीजन अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.


0 comments:

Post a Comment