बिलोली: उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची बदली नागपूर सहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाल्याचे मंगळवारी आदेश निघाले. चांडक यांची बदली झाली असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली असून. असंख्य नागरिक चांडक यांच्या बदलीचे आदेश समाजमाध्यमातून फिरवत आहेत. त्यामुळे अवैध धंदे करणारे अच्छे दिन येणार म्हणून सुखावले असून. एक दिड वर्षापासून तंगीथ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनीही मोकळा श्वास घेतला आहे.
अवैध धंदे करणाऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची नागपूर येथे बदली झाली असल्याने नायगाव व बिलोली तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यासाठी मंगळवार हा दिवस अतिशय आनंदाचा ठरला आहे. सहायक पोलीस अधीक्षक म्हणून अर्चित चांडक यांनी नायगाव तालुक्यात दमदार कामगिरी केली, मटका, गुटखा व अवैध दारु विक्रेत्यांना सळो की पळो करुन सोडले होते. गुटखा व अवैध दारु विक्री बाबत सतत मोहीमच राबवून धाडसी कारवाया केल्या होत्या. नायगाव तालुक्यातील ठाणेदारांनी अवैध धंद्यांना कितीही पाठबळ दिले असले तरी हि माहिती चांडक यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर कारवाई निश्चितच होत होती.
विशेषतः सामाजिक कार्यकर्ते व प्रामाणिक नागरिकांची चांडक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबध होते त्यामुळे बिलोली उपविभागातील अवैध धंद्याची माहिती त्यांना मिळत होती. आजपर्यंत कारवाई करतांना त्यांनी त्या त्या ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्याऐवजी दुसऱ्या ठाण्यातील कर्मचाऱ्याचा कारवाई करण्याच्या कामात मोठ्या खुबीने वापर करुन घेत असत.चांडक यांनी केलेल्या अनेक धाडसी व मोठ्या कारवायापैकी बिलोली तालुक्यातील रेती घाटावर केलेली कारवाई आजही नागरिक विसरले नाहीत. महसूल विभागाने कागदी घोळ करुन केलेली कारवाई निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला असला तरी जनतेत चांडक हे आजही हिरोच राहीले आहेत. त्यांचा एक दिड वर्षाचा काळ अतिशय चांगला गेला असून. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर अवैध धंदे बंद झाले पाहिजेत ही त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी अवैध धंदे बंद राहण्याबरोबरच अवैध धंदे करणाऱ्यांचे अर्थिक कंबरडे मोडण्याकडे लक्ष दिले होते.
त्यामुळे नायगाव तालुक्यातील ठाणेदारांनी चांडक यांची चांगलीच धास्ती घेतली होती. मात्र मंगळवारी चांडक यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली आदेश प्राप्त होताच एवढे दिवस चांडक यांची धास्ती घेतलेल्या बिलोली व नायगाव तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला असून अवैध धंदे करणाऱ्यांना आता मैदान मोकळे झाले आहे.







0 comments:
Post a Comment